रत्नागिरी : चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी घुसखोरांना दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी १२ नोव्हेंबरला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अटक केली. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील नाखरे-कालरकोंडवाडी येथे घडली.

हेही वाचा – Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – Uddhav Thackeray : “तुमचं नियुक्ती पत्रक दाखवा, पाकिटातील पैसे दाखवा”, सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच उद्धव ठाकरेंनी घेतलं फैलावर!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वहिद रियाज सरदार (वय ३४), रिजाउल हुसेन करीकर (वय ५०), शरिफूल हौजीआर सरदार (वय २८), फारुख महंमद जहीरअली मुल्ला (वय ५०), हमिद मुस्तफा मुल्ला (वय ४५), राजु अहमद हजरतली शेख (वय ३१), बाकिबिल्लाह अमीर हुसेन सरदार (वय ३९), सैदूर रेहमान मोबारक अली (वय ३४) आलमगिर हूसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (वय ३४), मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार (वय ३२), मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (वय ३८), मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार (वय ४५) आणि मोहम्मद लालूट मोंडल सन ऑफ किताब अली (वय ३७, सर्व रा. ढाका, बांग्लादेश) अशी अटक करण्यात आलेल्या तेरा जणांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी शाखेचे पोलीस नाईक रत्नकांत शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित १३ बांगलादेशी घुसखोर जून २०२४ पासून आतापर्यंत वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत- बांग्लादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ, रत्नागिरी) याच्या नाखरे ग्रामपंचायती हद्दीतील कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर वास्तव्य करताना आढळून आले. त्यांच्या विरोधात पारपत्र भारतात प्रवेश नियम १९५० चा नियमासह ६, परकिय नागरिक आदेश १९४८ परि. ३(१) (अ), परकिय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader