Ink on Fingers controversy : राज्यात महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक गैरव्यवस्था समोर आली आहे. त्यातच मतदानानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचा आरोप केला जातोय. सामान्य नागरिकांनीही यासंदर्भातील तक्रार केली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सुरेश काकणी यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.
२०१० पासून इंक वापरतोय
“नियमित जी शाई वापरली जाते तीच शाई वापरली जात आहे, त्यात कोणताही दुसरा घटक नाहीय. मार्कर पेनच्या स्वरुपात राज्य निवडणूक आयोग २०११ पासून ही शाई वापरत आहे. ही शाई लावल्यानंतर त्याला सुकण्याकरता १० ते १२ सेकंद लागतात. हे १०-१२ सेकंद मतदार मतदान केंद्रातच असतो. ड्राय झाल्यानंतर ही शाई काढता येत नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाई वापरतेय तीच ही शाई आहे. जर दुबार मतदान झाले तर मतदान केंद्राच्या अध्यक्षावर कारवाई होणार”, असं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.
हा संभ्रम पसरवला जात आहे. ही शाई २०११ पासून वापरत आहोत. मार्कर पेनच्या स्वरुपातच वापरली जात आहे, त्यामुळे याच निवडणुकीत असा संभ्रम पसरवणं चुकीचं आहे. शाई ड्राय झाल्यावर पुसली जात नाही. २०११ पासून कोरस कंपनीचीच शाई वापरली जात आहे, असं ते म्हणाले.
फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न
दरम्यान, शाई पुसली जातेय हा फेक नरेटिव्ह पसरवला जातोय. मतदारांचीही जबाबदारी आहे की त्यांनी शाई पुसू नये. ड्राय पुसली तर ती मतदारांची चुकी आहे. मतदारांविरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही दिनेश वाघमारे यांनी दिली.
जे व्हिडीओ समोर आलेत, त्याची चौकशी करू. फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न कोणी केला तर आम्ही त्याविरोधात कारवाई करू, असंही वाघमारे म्हणाले. तसंच, मतदान केंद्र सापडल्या नसल्यावरूनही वाघमारे यांनी मतदारांवरच खापर फोडलं. मतदारांनी मतदान केंद्र आणि नाव ऑनलाईन तपासणे गरजेचे होते, असं ते म्हणाले.
