scorecardresearch

‘…नाहीतर करेक्ट कार्यक्रम’, आमदार अमोल मिटकरींना धमकी

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना ‘व्हाट्सअप’वरून धमकीचा संदेश आला आहे.

amol mitkari threatening message
अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता टीम

अकोला: राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना ‘व्हाट्सअप’वरून धमकीचा संदेश आला आहे. ‘राज साहेबांवर वक्तव्य करताना जरा सांभाळून, नाहीतर करेक्ट कार्यक्रम होणार’, अशी धमकी दिली. यावर मत नसलेल्या सेनेचा टुकार कार्यकर्ता म्हणत अमोल मिटकरी यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत स्वतः याची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने आज मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली. राज्यातील परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी अकोला शहरातील सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दखल घेत आरोपीस तत्काळ अटक करावी.’ ठार मारण्याची धमकी व इशाऱ्याचा संदेश प्राप्त झाला असून मला व माझ्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन सदर अज्ञात इसमावर तात्काळ कारवाई करून अटक करावी, अशा प्रकारची तक्रार मिटकरी यांनी पोलिसात दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 15:35 IST

संबंधित बातम्या