पतीच्या खूनप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक

अनैतिक संबंधांत अडसर नको, या हेतूने पत्नीने पतीच्या खुनाचा बेत आखला व खून घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पत्नीसह तिच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

अनैतिक संबंधांत अडसर नको, या हेतूने पत्नीने पतीच्या खुनाचा बेत आखला व खून घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पत्नीसह तिच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली.
औसा तालुक्यातील शिरसल तांडा येथील संपदाबाई रमेश चव्हाण हिचे लहू गुलाबराव पवार (चिंचोलीराव तांडा) याच्याशी अनतिक संबंध होते. त्याने दोन साथीदारांसह संपदाबाईचा पती रमेश चव्हाण यांच्या खुनाचा कट रचला. ऊसतोडणीची उचल आणण्यासाठी बाहेर पडलेल्या चव्हाणला तिघांनी गुंगवून ठेवले. रात्री दारू पाजली. नंतर दोन दुचाक्यांवरून निघाल्यावर वाटेत माळकोंडजी शिवारात चव्हाण यास गळफास देऊन ठार केले व पुरावा नष्ट करण्यासाठी अंगावर पेट्रोल टाकून काडी ओढून तिघे पसार झाले. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद झाली व दोन दिवसांत लहू गुलाब पवार (वय २४), अमोल विष्णुकांत घोलप (वय २१) व संपदाबाई रमेश चव्हाण (वय २५) या तिघांना पोलिसांनी अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three arrested including wife in issue of murder of husband

ताज्या बातम्या