सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावच्या शिवारात शेततळ्यात पडून तीन निरागस मुलांचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाचनंतर ही दुर्घटना उजेडात आली. यात दोघे मुले मृत भावंडे होते.
सिध्दार्थ निकम आणि त्याचा भाऊ विनायक निकम यांच्यासह कार्तिकेश हिंगमिरे अशी दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत. आत्या-मामाची मुले असलेले हे तिघेही सायंकाळी एका शेततळ्याच्या किनारी जाऊन खेळत होती. खेळताना ती शेततळ्याच्या काठावर आली. परंतु अचानकपणे एका मुलाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला आणि बुडाला. त्यास वाचविण्याच्या प्रयत्नात अन्य दोघेही पाण्यात बुडाले. नंतर ही दुर्घटना गावात समजताच तेथे धावून आलेल्या गावक-यांनी शेततळ्यातून तिन्ही मुलांना बेशुध्दावस्थेत बाहेर काढली. नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. मोहोळ पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
Accident on Samriddhi highway in Sinnar taluka two dead three seriously
सिन्नर तालुक्यात समृध्दीवर अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
A woman and two little girls drowned in Panganga river yawatmal
महिलेसह दोन लहान मुलींचा पैनगंगा नदीत बूडून मृत्यू; आर्णीतील कवठा बाजार येथील घटना
drowned
साताऱ्यातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू