Video: धाडस डोंगराऐवढं… अवघ्या चार आणि सात वर्षाच्या चिमुकल्यांनी सर केला मलंग गड

लहान मुलांमध्ये महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांबाबत जनजागृती व्हावी, किल्ल्यांची माहिती त्यांना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम करण्यात आला.

childrens from maharashtra climbed malang fort
चिमुकल्यांनी सह्याद्री रॉक एडव्हेंचर गिर्यारोहक समूहाच्या सहकार्याने हा पराक्रम करून दाखवला आहे.

महाराष्ट्रातील तीन चिमुकल्यांनी कमालच केली आहे. अवघ्या चौथ्या आणि सातव्या वर्षी या मुलांनी माथेरान डोंगररांगांमध्ये असलेला ‘मलंग’गड सर केला आहे. सह्याद्री रॉक एडव्हेंचर गिर्यारोहक समूहाच्या सहकार्याने त्यांनी हा पराक्रम करून दाखवला आहे. ओम ढाकणे, परिणीती लिंगे आणि अवंती गायकवाड अशी या मुलांची नावे आहे. यापैकी ओम अवघ्या चार वर्षांचा आहे. तर परिणीती आणि अवंती या सात वर्षाच्या आहेत. लहान मुलांमध्ये महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांबाबत जनजागृती व्हावी, त्यांची माहिती त्यांना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम केल्याचे भूषण पवार यांनी सांगितले. या चिमुकल्यांनी पराक्रम करत गड कसा सर केला ते पाहुयात व्हिडीओच्या माध्यमातून.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three childrens from maharashtra has been successfully climbed malang fort kak

ताज्या बातम्या