Coronavirus: मालेगावात एकाच दिवसात तीन करोनाबाधितांचा मृत्यू

गेल्या चोवीस तासांत अकरा नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मालेगावातील करोनाबाधितांची संख्या आता ९६ वर पोहोचली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बुधवारी एकाच दिवसात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात इतर भागांपेक्षा सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मालेगावमध्येच आढळून आले आहेत.

मालेगावातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका करोनाबाधित तर दोन करोनासंशयित अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांत अकरा नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मालेगावातील करोनाबाधितांची संख्या आता ९६ वर पोहोचली आहे. यांपैकी १० करोनाबाधितांचा पहिला करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच आत्तापर्यंत करोनामुळं नऊजण दगावले असून अन्य तीन करोना संशयित मृतांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ३२ वर्षीय रुग्णाचा सकाळी मृत्यू झाला. करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच जीवन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेला एक ४५ वर्षीय करोनाबाधित पुरुष व ४९ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Three corona virus deaths in a day in malegaon aau

Next Story
मोर्चेकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे कोंडी
ताज्या बातम्या