सांगली : सांगलीमध्ये २४  तासात झालेल्या दोघांच्या हत्येनंतर मिरजेतही एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याने महापालिका क्षेत्र हादरले आहे. हरिपूर रस्त्यावरील खुनाचा प्रकार वगळता अन्य दोन प्रकार अत्यंत किरकोळ कारणातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले असून तीनही प्रकरणातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी माहिती अशी,की हरिपूरमधील गणेश दर्शन करून पत्नीसह दुचाकीवरून परतत असताना सुरेश नांद्रेकर यांच्यावर अज्ञातांकडून लोखंडी रॉडने हल्ला झाला. यामध्ये  ते गंभीर जखमी झाले तर पत्नी निमिषा या जखमी झाल्या. दोघांनाही तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना नांद्रेकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ हालचाली करून निखिल साळुंखे, किरण घस्ते, दत्ता खांडेकर व विजय पाटील या चौघांना अटक  केली. जुन्या वाहनाच्या खरेदीविक्रीच्या देण्याघेण्यावरून नांद्रेकर यांचा खून करण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

तर या प्रकाराला २४ तास पूर्ण होण्यापूर्वीच सामान्य रुग्णालय ते मध्यवर्ती बस स्थानक मार्गावर एका  बारमध्ये झालेल्या वादावादीतून मंगळवारी सायंकाळी सात वाजणेच्या सुमारास रोहन नाईक याचा धारदार हत्याराने भोसकून खून करण्यात आला. मृत नाईक मित्रासमवेत मद्य पिण्यासाठी बारमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या गटाशी वादावादी झाली होती. या वादातूनच ही हत्या झाल्याचे समजते. या प्रकरणी हल्लेखोर सहा जण असून यापैकी दोघांना बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

दरम्यान, सांगलीत लागोपाठ झालेले खुनाचे दोन प्रकार समोर आले असतानाच मंगळवारी रात्री मिरजेतील पाठक वृध्दाश्रमाजवळ ओळख का दिली नाहीस, या किरकोळ कारणावरून सदानंद सोनकर या २१ वर्षांच्या तरुणावर चाकू हल्ला झाला. हल्ल्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी जखमीला चाकूसह रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरी त्यांच्या जिवाचा धोका अद्याप टळलेला नाही. या  प्रकरणी सरफराज सय्यद, सूरज कोरे, प्रथमेश ढेरे व विशाल शिरोळे या चौघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू सावंत्रे यांनी बुधवारी दिली. लागोपाठ झालेल्या तीन प्राणघातक प्रकारानंतर सांगली, मिरज शहर हादरले असून किरकोळ कारणातून झालेल्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क करण्यात आली आहे.