scorecardresearch

कबड्डीचे सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या युवकांची गाडी पलटी; तिघांचा मृत्यू

मध्य प्रदेश सीमा लागत असलेल्या वैजापूर येथील नागरिक अंबावतार या गावी कबड्डीचे सामना पाहण्यासाठी जात असताना रात्री पिकअप वाहन पलटी झाल्याने अपघात झाला.

कबड्डीचे सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या युवकांची गाडी पलटी; तिघांचा मृत्यू
(सांकेतिक छायाचित्र)

महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमा लागत असलेल्या वैजापूर येथील नागरिक अंबावतार या गावी कबड्डीचे सामना पाहण्यासाठी जात असताना रात्री पिकअप वाहन पलटी झाल्याने अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या घटनेत तिघांना मृत्यू झाला आहे. तर जखमींना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. जगदीश बारेला (२१), पंकज बारेला (२२), निलेश बारेला (२५) असे अपघाता मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा – टीईटी घोटाळ्यासंदर्भात अंबादास दानवे यांचं मोठं विधान; म्हणाले, “माझ्याकडे सत्तारांविरोधात …”

२९ ऑगस्टरोजी वैजापूर येथील नागरीक अंबारवतार येथे कबड्डीचे सामने पाहण्यासाठी पिकअप वाहनात बसून जात होते. दरम्यान रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. त्यानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी तिघांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला अशी माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.