वाडा तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात चार ठार, पाच जण जखमी

वाडा तालुक्यातील नेहरोली महामार्गावरील नेहरोली येथे पहिला अपघात झाला.

accident
सांकेतिक फोटो

वाडा तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले असून या अपघातांमध्ये चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाडा तालुक्यातील नेहरोली महामार्गावरील नेहरोली येथे पहिला अपघात झाला. एक तरुण दुचाकी चावलत असताना अपघाताची ही घटना घडली. हा अपघात एवढा गंभीर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा>>> पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांना मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

तर दुसरा अपघात वाडा-मनोर महामार्गावर कंचाड फणसपाडा येथे झाला. येथा एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना चिरडले. या अपघातात वाडा तालुक्यातील आमगाव गावातील योगेश सुभाष गोवारी (२०) तसेच किरण यशवंत बाणे हे दोन्ही तरुण जागीच ठार झाले.

हेही वाचा>>> नवनीत राणा यांची अटक राजकीय होती का? मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीच दिलं उत्तर; म्हणाले…

तर तिसरा अपघात विक्रमगड-डहाणू या मार्गावर गडदे गावाजवळ झाला. वाडा तालुक्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी प्रशिक्षणसाठी डहाणू येथे गेले होते. ते संध्याकाळी परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात दिलीप यशवंत मोरे (४५) या आरोग्य सेवकाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी असून यातील राजेंद्र गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना ठाणे येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three different accidents in wada taluka four people died prd

Next Story
पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांना मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी