सोलापुरातील तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे हायवेवरील खोपोलीजवळ झालेल्या अपघातात या तरुणांनी आपला जीव गमावला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर शहरात शोककळा पसरली होती. दरम्यान त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ राजगुरू यांचं निधन झालं. मृत गौरव खरात हे काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. नितीन राऊत यांना भेटण्यासाठी जात असताना अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी जमली होती.




मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांचा विचित्र अपघात; चौघे जागीच ठार
सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत एकाचवेळी तीन मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशीलकुमार शिंदे, नितीन राऊत यांनी खालापूरमध्ये पार्थिवांचं अत्यंदर्शन घेतलं होतं.
अपघात नेमका कसा झाला?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात मंगळवारी भीषण अपघात होऊन चार जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झाले.
नेमकं घडलं काय?
ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांचा अपघात घडला. पाच वाहनांच्या अपघातात कंटेनरने पुढे जाणा-या स्वीफ्ट कारला धडक दिली. स्वीफ्ट कार तिच्या पुढे जणाऱ्या आयशर टेम्पोला मागून धडकली. टेम्पोने तिच्या पुढील वेन्यू कारला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वीफ्टमधील चारही प्रवासी जागीच ठार झाले तर टेम्पोने धडक दिलेल्या कारमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. टेम्पोची धडक बसलेल्या वेन्यू कारने पुढे जाणा-या कंटेनरला जोरदार धडक दिली. मात्र हा कंटेनर पुढे निघून गेला.