१८ जागांसाठी आघाडी-भाजपमध्ये सामना

सांगली :  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विकास सोसायटी गटातील तीन जागा महाविकास आघाडीच्या अविरोध निवडून आल्या असून उर्वरित १८ जागासाठी महाविकास आघाडी व भाजप असा सामना होत आहे. राष्ट्रवादीचे आ. मानसिंगराव नाईक व शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्यासह काँग्रेसचे महेंद्र लाड यांची अविरोध निवड झाली आहे. तर खासदार संजयकाका पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. निवडणूक अविरोध करण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत सुरू होता. मात्र राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी तीन जागांचा दिलेला प्रस्ताव भाजपने अमान्य करीत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आज घेतला. यामुळे महाविकास आघाडीने सहकार विकास पॅनेलच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला तर भाजपने शेतकरी विकास पॅनेलच्या नावाखाली आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

शिराळा, खानापूर व पलूस अ गट वर्गातून अनुक्रमे महाविकास आघाडीतून आ. मार्नंसगराव नाईक, आ. अनिल  बाबर व महेंद्र  लाड यांची अविरोध निवड झाली आहे. तर भाजपचे खा. संजयकाका पाटील यांनी वडिलांच्या निधनामुळे निवडणुकीतून माघार घेतली. विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष संग्रार्मंसह देशमुख मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे ७ तर शिवसेनेचे तीन उमेदवार आहेत. 

महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार विकास पॅनेलचे उमेदवार असे आ. मार्नंसगराव नाईक, आ. अनिल बाबर, महेंद्र लाड (अविरोध विजयी) अ गट- अजितराव घोरपडे, तानाजी पाटील, आ. मोहनराव कदम, दिलीप पाटील, विशाल पाटील, आ. विक्रम सावंत, बी.एस. पाटील, महिला राखीव- जयश्री पाटील, अनिता सगरे, अनुसूचित जाती- बाळासाहेब व्हनमोरे, इतर मागासवर्ग- मन्सूर खतीब, भटक्या विमुक्त जाती जमाती- राजेंद्र डांगे, पाणी पुरवठा संस्था – वैभव शिंदे, प्रक्रिया संस्था गट- सुरेश पाटील, पतसंस्था – किरण लाड, पृथ्वीराज पाटील, मजूर संस्था- हणमंतराव देशमुख व सुनील ताटे.

भाजप प्रणीत शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार- अ गट- नाथाजीराव देशमुख, तुकाराम शिंदे, भानुदास मोरे, उमेश पाटील, प्रकाश जमदाडे, सुनील जाधव, महिला राखीव- दीपाली पाटील, संगीता खोत, इतर मागासवर्ग- तमणगौडा रवि पाटील, अनुसूचित जाती- रमेश साबळे, कृषी संस्था-चंद्रकांत पाटील, पतसंस्था- राहुल महाडिक, अजित चव्हाण, मजूर संस्था- संग्रार्मंसह देशमुख व सत्यजित देशमुख.