अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळ शुक्रवारी सकाळी खासगी मोटार आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर दोन गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७५ वर्षीय वृद्धा आणि दोन मुलांचा समावेश आहे.

 शाळेला सुट्टी पडल्याने मुंबई- बोरीवली येथील तावडे कुटुंब देवगड येथील आपल्या गावी  मोटारीने जात होते. माणगावजवळ ही मोटार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. धडक इतकी भीषण होती की मोटारीचा पुढचा भाग ट्रकच्या खाली अडकला. अपघातात  वैशाली विजय तावडे (७५) आणि त्यांच्या रिवान दर्शन तावडे (३) आणि रित्या दर्शन तावडे (६) या नातवंडांचा जागीच मृत्यू झाला. तर दर्शन तावडे आणि श्वेता तावडे हे गंभीररीत्या जखमी झाले.

99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
A woman and two little girls drowned in Panganga river yawatmal
महिलेसह दोन लहान मुलींचा पैनगंगा नदीत बूडून मृत्यू; आर्णीतील कवठा बाजार येथील घटना
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू

अपघाताचे वृत्त समजताच माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जखमींना  माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.

अपघातप्रकरणी मोटारचालक दर्शन विजय तावडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोटारचालक एका वाहनाला ओलांडून जाताना  समोररून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याचा प्राथमिक निष्कर्ष माणगाव पोलिसांनी तपासात काढला आहे.