scorecardresearch

Premium

भेकर व चौसिंगाची शिकार केल्याबद्दल जवानासह तिघेजण गजाआड; साताऱ्यात वनविभागाची कारवाई

संशयितांकडून दोन बंदुका, एक एअरगन, सिंगलबोअर बंदूक, जिवंत काडतुसे, भेकर सोलण्याचे चाकू, कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेले मांस, कातडे जप्त करण्यात आले आहे.

भेकर व चौसिंगाची शिकार केल्याबद्दल जवानासह तिघेजण गजाआड; साताऱ्यात वनविभागाची कारवाई

कराड : भेकर व चौसिंगा या वन्यप्राण्यांची शिकार उघडकीस आणताना वनखात्याच्या पथकाने आसाम रायफल या सैन्यदलातील बंदुकधारी (रायफलमॅन) युवराज निमन याचेसह अन्य दोघांना अटक केली. नारायण सीताराम बेडेकर व विठ्ठल किसन बेडेकर (दोघेही रा. ठोसेघर, ता. सातारा) अशी युवराज निमनच्या साथीदारांची नावे आहेत.

याबाबतची माहिती मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी दिली. त्यात म्हटले आहे, की सातारच्या माचीपेठेतील युवराज निमनच्या राहत्या घरावर उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आज सोमवारी छापा मारला असता तेथे भेकर व चौसिंगा प्राण्याचे मुंडके व भेकराचे ताजे मांस, पायाचे खुर मिळून आले. युवराज निमनकडील अधिक चौकशीत त्याने या शिकारी ठोसेघर येथील नारायण सीताराम बेडेकर, विठ्ठल किसन बेडेकर व स्वतः अशा तिघांनी मिळून केल्याचे सांगितले.

motorized garbage collection vehicle, strike of contract basis workers
चंद्रपूर : आता कचरा संकलन होणार मोटराइज्ड घंटागाडीने, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महापालिकेची व्यवस्था
Fraud businessman Ulhasnagar pretending Income Tax Department official
ठाणे: आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्याची फसवणूक
Police action on Koyata Gang Dekhava
VIDEO: गणेश विसर्जन मिरवणुकीत थेट कोयता गँगच्या विरोधातच देखावा! पाहा भन्नाट कलाकृती
consumer court order to pay compensation to farmers for ignoring complaint
बियाणे उगवले नाही; कृषी अधिकाऱ्याला दणका, शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याचे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश

हेही वाचा: आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नारायणकडील सिंगलबोअर बंदुकीने आज सकाळी साडेसातच्या सुमारास भेकराची शिकार केली व भेकर चेटकीच्या ओढ्यात सोलून त्याच्या मटणाचे वाटे केले. त्यातील भेकराचे मुंडके, थोडे मांस हे निमनला मिळाले. कातडे सोलून ओढ्यात लपवण्यात आले. उरलेल्या मांसातील थोडा वाटा विठ्ठलला तर उरलेले सर्व मांस नारायण आपल्या घरी घेऊन आला. नारायणने हे मांस स्वतःच्या घरामागील शेणीखाली लपवून ठेवले. हे मांस साताऱ्यातील कोणा बड्याहस्तीला देण्यासाठी लपवून ठेवले होते व ते हे मांस रात्री घेवून जाणार होते असे नारायणने सांगितले. या तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन बंदुका, एक एअरगन, सिंगलबोअर बंदूक, जिवंत काडतुसे, भेकर सोलण्याचे चाकू, कोयता व वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेले मांस, कातडे हे घटनास्थळी संबंधितांनी दाखवलेले आहे. ते पंचासमोर जप्त करून वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. हे शिकारी सराईत असून, त्यांनी यापूर्वीही गुन्हे केल्याचे पुरावे वनविभागास मिळाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three people including a soldier are jailed hunting bhekar and chausinga action forest department satara tmb 01

First published on: 14-11-2022 at 21:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×