scorecardresearch

सातारा : महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर टेम्पो चारशे फूट दरीत कोसळला; तीन गंभीर जखमी, दोन दिवसात दुसरी घटना

अपघातानंतर हा टेम्पो झाडामध्ये अडकला. दोन दिवसांपूर्वी मुकदेव घाटात टेम्पो दरीत कोसळून झालेल्या अपघातात लहान मुले, महिलांसह चाळीस मजूर जखमी झाले होते.

सातारा : महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर टेम्पो चारशे फूट दरीत कोसळला; तीन गंभीर जखमी, दोन दिवसात दुसरी घटना
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर टेम्पो चारशे फूट दरीत कोसळला

महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर चिखली शेड जवळ रात्री इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन निघालेला टेम्पोचा ब्रेक फेल होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो चारशे फूट दरीत कोसळला.या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाई येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील दोन दिवसात टेम्पोचा ब्रेक फेलहोऊन टेम्पो कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

हेही वाचा- नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल

महाबळेश्वर तापोळा रस्त्यावरील चिखली शेडजवळ रविवारी रात्री टेम्पोचा ब्रेक फेल होऊन गाडी चारशे फूट खोल दरीत कोसळली.
इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन हा टेम्पो जात होता. अपघातानंतर हा टेम्पो झाडामध्ये अडकला. या टेम्पोमध्ये तीन युवक होते ते जखमी झाले आहेत. रात्रीच्या अंधारात यातील एक युवक झाड, फांद्यांच्या आधाराने मुख्य रस्त्यावर आला आणि अपघाताची माहिती त्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दिली.

हेही वाचा- सातारा पोलिसांची नागरिकांच्या सहकार्यातून अजिंक्यताऱ्यावर स्वच्छता मोहीम, पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा सहभाग

सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून त्यांना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी दोघांना त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी या टेम्पोमधील फ्रिज टीव्ही आदी इलेकट्रीक वस्तू बाहेर काढण्याचे काम सुरु होते. दोन दिवसांपूर्वी मुकदेव घाटात टेम्पो दरीत कोसळून झालेल्या अपघातात लहान मुले, महिलांसह चाळीस मजूर जखमी झाले होते. महाबळेश्वर तालुक्यातील दोन दिवसांत घडलेली अपघाताची ही दुसरी घटना आहे.महाबळेश्वर येथून दहा किमी अंतरावर तापोळा मुख्य मार्गावर हा अपघात झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 13:45 IST

संबंधित बातम्या