साताऱ्यातील तीन बँकांना तिघांकडून १ कोटी ४१ लाखांचा गंडा

तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरु

ATMs in sawantwadi
संग्रहित छायाचित्र

सातारा जिल्ह्यातील बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरणाऱ्यांनीच आपसात संगनमत करून १ कोटी ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे सातारा शहरातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सगळे संशयित सातारा तालुक्यातील आहेत. स्टेट बँक, अॅक्सेस बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तीन बँकांची ही रक्कम असल्याचीही माहिती समोर आली आहे.

प्रमोद शिंदे (विसावा पार्क), विक्रम शिंदे (अंगापूर वंदन), वैभव वाघमाळे (कण्हेर) या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अरविंद बनगे यांनी तक्रार दिली आहे. अरविंद बनगे हे सिक्युरिट्रन्स इंडिया प्रा. लि. या कंपनीचे मॅनेजर आहेत. या कंपनीद्वारे बँकेतील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम केले जाते. या कंपनी अंतर्गत साताऱ्यातही काम सुरु होते. हे तिघे संशयित याच कंपनीत काम करत होते अशीही माहिती समोर आली आहे. १३ फेब्रुवारी २०१७ ते १० जुलै २०१८ या कालावधीत या तीन संशयितांनी एटीएममध्ये पैसे न भरता ते परस्पर लांबवले असे बनगे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three thieves fraud of three banks for 1 crore 41 lakhs in satara

ताज्या बातम्या