तुळजापूरला देवदर्शनासाठी जाताना अपघातात नाशिकच्या तीन तरुणांचा मृत्यू; पाच जखमी

नाशिक येथून तुळजापूरकडे निघालेल्या तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन त्यात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तर अन्य पाचजण जखमी झाले.

Three youths died accident solapur
तुळजापूरला देवदर्शनासाठी जाताना अपघातात नाशिकच्या तीन तरुणांचा मृत्यू; पाच जखमी (प्रातिनिधिक छायाचित्र)

सोलापूर : तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी नाशिक येथून तुळजापूरकडे निघालेल्या तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन त्यात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. तर अन्य पाचजण जखमी झाले. सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर तामलवाडीजवळ तुळजापूर तालुक्याच्या सीमेवर हा अपघात झाला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

निखील रामदास सानप (वय २१), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय २२) आणि अथर्व शशिकांत खैरनार (वय २२, तिघे रा. चास, ता.सिन्नर, जि. नाशिक) अशी या अपघातातील दुर्दैवी मृतांची नावे आहेत. तर गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बीडकर (वय २२) आणि दीपक बीडकर (वय २६, सर्व रा. चास, ता. सिन्नर) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – सांगली : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली असा संदेश देत तरुणाची आत्महत्या

हेही वाचा – VIDEO: कांद्याने रडवलं! साडेतीन टन कांदा विकला पण दमडीही नाही मिळाली, हवालदिल शेतकऱ्याने मांडली व्यथा

हे सर्वजण एकाच गावातील राहणारे तरुण देवदर्शनासाठी पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट येथे जाण्याकरिता बोलेरे गाडीतून (एमएच १५ ईएक्स ३२११) प्रवास करीत होते. सकाळी सोलापुरातून तुळजापूरकडे त्यांची बोलेरे गाडी निघाली. तुळजापूर तालुक्याच्या सिमेवर तामलवाडीजवळ बोलेरे गाडीचे टायर फुटले आणि गाडी पालथी झाली. या अपघातात तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींच्या मदतीसाठी तामलवाडी पोलिसांसह स्थानिक तरुणांनी धाव घेतली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 19:41 IST
Next Story
VIDEO: कांद्याने रडवलं! साडेतीन टन कांदा विकला पण दमडीही नाही मिळाली, हवालदिल शेतकऱ्याने मांडली व्यथा
Exit mobile version