जळगावातल्या पाचोरा या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेच्या पाहणीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पाचोरा या ठिकाणी आले आहेत. सभेची तयारी पूर्ण झाली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच मी कुठल्याही धमक्यांना भीत नाही वाघ आहे वाघाला कधी सुरक्षेची गरज लागत नाही कुठल्याही सुरक्षेशिवाय मी फिरतो असं म्हणत गुलाबराव पाटील यांनाही संजय राऊत यांनी पाचोऱ्यात उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

“सभा तर जोरदार होणार आहे रविवारी. आरवतात्या पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरणही उद्या होणार आहे. आरवतात्या आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचं कृषी क्षेत्रात केलेलं काम मोठं आहे. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रात या सभेची चर्चा आहे. संपूर्ण पाचोरा आणि संपूर्ण महाराष्ट्र या सभेची वाट पाहतो आहे.”

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

गुलाबराव पाटील यांच्या आव्हानाला उत्तर

आम्ही तर जळगावात कालपासून आलो आहे. घुसण्याची भाषा कुणी करावी? जे इमानदार शिवसैनिक आहेत त्यांनी घुसण्याची भाषा करावी. छातीवर वार झेलणारे, कठीण प्रसंगात शिवसेनेसोबतच उभे राहतात त्यांनी ही भाषा करावी. जे पळपुटे आहेत, जे डरपोक आहेत, जे संकट काळी पळून जातात त्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. हा जो भगवा झेंडा इथे आहे त्याचं तेज सगळ्यांना पेलवत नाही. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आमच्या सभेत कडवट शिवसैनिक येतील असंही राऊत म्हणाले.

वाघाला कसली सुरक्षा हवी?

“मला सुरक्षेची गरज नाही. मी समर्थ आहे. वाघाला सुरक्षेची गरज लागते का सुरक्षेची? मी समोरून अंगावर जाणारा माणूस आहे. हे बंदुकवाले, स्टेनगनवाले, बॉडीगार्डस हे कधी बघताय का माझ्या आजूबाजूला? असले तरी मी बाजूला ठेवतो. मी एकटाच फिरतो. शिवसैनिक असतात सोबत. शिवसैनिकांच्या अंगावर जाणं सोपं नाही. जो बेईमान असतो, बाडगा असतो तो जरा मोठ्याने बांग देतो तसं मी जळगावात पाहतो आहे” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि गुलाबराव पाटील यांना टोला लगावला आहे.

गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना चौकटीत राहून बोला अन्यथा सभेत घुसेन असा इशारा दिला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा उल्लेख गुलाबो गँग असा केला होता. आता वाघाला सुरक्षेची गरज लागत नाही मी मोकळा फिरतो आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.