Today's Petrol-Diesel Price : आज १२ ऑगस्ट २०२४ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. सध्या शहरांमध्ये दुचाकी, चारचाकी ऑफिसला घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्ग घरातून बाहेर पडल्यावर अनेकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासून पाहतो. नवीन योजना लागू झाल्यानंतर देशभरात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाचे दर सरकारी तेल कंपन्यांकडून जाहीर केले जातात.तर आज आठवडयाच्या पहिल्या दिवशी सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार की त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे हे आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासून पाहू शकता. तसेच तुम्हाला एक लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजावे लागणार पाहून घ्या… महाराष्ट्रातील इतर शहरांत काय आहेत पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर ? शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०४.८८९१.३९अकोला१०४.०५९०.६२अमरावती१०५.१०९१.६३औरंगाबाद१०४.९३९१.६०भंडारा१०४.९३९१.४६बीड१०५.८२९२.३०बुलढाणा१०४.७३९१.२७चंद्रपूर१०४.४४९१.००धुळे१०४.४५९०.९८गडचिरोली१०५.१६९१.६९गोंदिया१०५.५९९२.०९हिंगोली१०४.९९९१.५१जळगाव१०५.१४९१.६६जालना१०५.७४९२.२१कोल्हापूर१०४.४७९१.०१लातूर१०५.२९९१.८०मुंबई शहर१०३.४४८९.९७नागपूर१०३.९८९०.५४नांदेड१०६.२४९२.७१नंदुरबार१०५.१७९१.६७नाशिक१०४.६९९१.२०उस्मानाबाद१०५.२८९१.७९पालघर१०३.९७९०.४८परभणी१०७.३९९३.७९पुणे१०३.८८९०.४१रायगड१०३.७८९०.२९रत्नागिरी१०५.५२९१.९६सांगली१०४.७९९१.३३सातारा१०५.०३९१.५५सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१सोलापूर१०४.१२९०.६७ठाणे१०३.८९९०.४०वर्धा१०४.४४९०.९९वाशिम१०४.८७९१.४०यवतमाळ१०५.८२९२.३२ आजचे जाहीर झालेले नवीन दर पाहता आणि तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील अहमदनगर, गडचिरोली, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, सांगली या शहरांत पेट्रोलचे दर वाढले आहेत. तर कोल्हापूर, नागपूर, पुणे शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तर चंद्रपूर, रत्नागिरी, सांगली , यवतमाळ आदी शहरांत डिझेलचे दर वाढले आहेत. तर महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, पुणे, लातूर, कोल्हापूर, जालना, बीड या शहरांमध्ये डिझेलचे दर किंचित वाढलेले दिसत आहेत. तुम्ही हे दर तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा तपासू शकता. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Today's Petrol-Diesel Price )जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर नवीन दर जाहीर होतात व हे दर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजच्या किमती पाहता महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठलेला दिसत आहे. तुम्हीसुद्धा घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर तपासून घ्या आणि पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.