अलिबाग :-  पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून अलिबाग येथे आलेला पर्यटक अलिबाग समुद्रकिनारी बुडाला. त्याचा शोध सुरू आहे. अविनाश शिंदे वय २७ असे या पर्यटकाचे नाव आहे. ठरला आहे. आळंदी येथील कंपनीत काम करणारे पाच जण  अलिबाग मध्ये गुरुवारी पर्यटनासाठी आले होते. अलिबाग समुद्र किनारी आल्यानंतर अविनाश समुद्रात पोहण्यासाठी गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने. अविनाश समुद्रात बुडाला.

जीवरक्षक हे जॅकेट घेऊन समुद्रात उतरले. मात्र अविनाशचा शोध लागला नाही. अलिबाग पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले .  अविनाश यांच्या नातेवाईकाना या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist drowned in alibaug sea amy