नाताळाच्या सलग सुट्टीनिमित्त पुणे मुंबईकर पर्यटन व गावाकडे निघाल्याने पुणे बंगळुरु महामार्गावर सकाळ पासून मोठ्या प्रमाणात वाहनांची तुडुंब गर्दी झाली आहे. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.खेड शिवापूर व आणेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सलग तीन दिवसांच्या सुट्यामुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी व गावाकडे जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने चांगलीच वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या. करोना प्रादुर्भाव व टाळेबंदीमुळे नागरिक घरातच अडकून होते. सलग सुट्ट्या, मोठ्या शहरातील रात्रीची संचारबंदीमुळे नागरिकांनी पर्यटन व गावासाठी बाहेर पडण्याला प्राधान्य दिले आहे.
मागील अनेक दिवस कुटुंबासह घराबाहेर न पडलेले नागरिक करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुणेकर, मुंबईकर सुट्ट्यांमुळे कुटुंबासोबत शहराबाहेर पडू लागले आहेत. पुणे-बंगळुरु महामार्गावर एकदम मोटारी रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडीत झाली. या महामार्गावर मुंबई-पुण्याचे पर्यटक कोल्हापूर, सातारा,सांगलीचे गावकडे जाणारे व पर्यटनासाठी महाबळेश्वर, कोकण गोव्याला जाणाऱ्यांमुळे पुणे-बंगळूरू महामार्गावरील खेड शिवापूर आणेवाडी टोलनाका,खंबाटकी घाट,पसरणी घाटात वाहनांच्या रांगेत अडकल्याने मोटारीत नागरीक बसून कंटाळले.पुण्या मुंबईकडून येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे.आज एस. टी. बस मध्येही गर्दी पाहण्यास मिळाली.
