लोणी येथे सुमारे ८ कोटी रुपये खर्चून आदिवासी वसतिगृह उभारणार – विखे

आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत देण्यात येणाऱ्या खावटी कर्ज योजनेतून मंजूर झालेल्या धान्य किटचे वितरण राधाकृष्ण विखे यांच्या  उपस्थितीत करण्यात आले.

माजीमंत्री आण्णासाहेब, प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, रेवन्नाथ जाधव, काळू रजपूत यांचीही यावेळी भाषणे झाली.

राहाता : आदिवासी समाजातील विद्याथ्यार्ंना, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लोणी येथे सुमारे ८ कोटी रुपयांचे स्वतंत्र आदिवासी वसतिगृह उभारण्याचा निर्णय राधाकृष्ण विखे यांनी केला. उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजातील विद्याथ्यार्ंसाठी  या वसतिगृहाचा मोठा दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत देण्यात येणाऱ्या खावटी कर्ज योजनेतून मंजूर झालेल्या धान्य किटचे वितरण राधाकृष्ण विखे यांच्या  उपस्थितीत करण्यात आले. माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, सभापती नंदाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राह्मणे, रेवन्नाथ जाधव, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, प्रकल्प समन्वयक अंबादास बागुल, सहायक योगेश चोथवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

राहाता तालुक्यात २ हजार ५८ आदिवासी कुटुंबीयांना खावटी कर्ज योजनेचा लाभ मिळाला आहे. तालुक्यात शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असून, राज्यातही आपण अव्वल स्थानी असल्याचे नमुद करून, विखे म्हणाले की, आदिवासी समाजासाठी घरकुलांची निर्मिती हा आपला प्राधान्यक्रम असणार आहे. विविध गावांच्या ग्रामपंचायतींनी या बाबत प्रस्ताव करण्याचे आवाहन करुन, त्यांनी सांगितले की, या समाजातील विद्यार्थी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागतील. केंद्र सरकारने लागू केलेल्या या योजनांचा लाभ यासाठी मिळवून द्यावा लागेल. याचाच एक भाग म्हणून लोणी येथे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांकरिता ८ कोटी रुपयांच्या निधीतून वसतिगृह मंजूर झाले असून, लवकरच त्याची उभारणी पूर्ण होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tribal hostel loni cost rs 8 crore vikhe ssh