नगर : राज्यस्तरीय पुरुषोत्तम नाटय़करंडक स्पर्धेत नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालय संघाने सादर केलेल्या ‘सहल’ एकांकिकेस सांघिक द्वितीय पारितोषिक व हरि विनायक करंडक तसेच कलाकारांनी वैयक्तिक चार पारितोषिके मिळवली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल हिंदू सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी कलाकारांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला.   विद्यार्थ्यांचे कौतुक करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक म्हणाले,की महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये मोठे यश संपादन करत आपला कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. ‘पुरुषोत्तम करंडक’ सारख्या प्रतिष्ठित नाटय़स्पर्धेमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना मोठा आनंद होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्याध्यक्ष अजित बोरा, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, महाविद्यालय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अनंत फडणीस, सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख प्रकाश जाधव आदींनी विद्यार्थी कलाकारांचे कौतुक करताना पारितोषिक प्राप्त एकांकिकेचे विशेष प्रयोग आयोजित करण्याचे मान्य केले. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trophy drama competition artist ysh
First published on: 25-01-2022 at 00:02 IST