scorecardresearch

रायगड : म्हसळा येथे ट्रकला अपघात ; १ महिला ठार , तीन जण गंभीर जखमी

ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याकडील संरक्षित कठड्यावर आदळून ट्रकचा अपघात झाला.

रायगड : म्हसळा येथे ट्रकला अपघात ; १ महिला ठार , तीन जण गंभीर जखमी
रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे ट्रकला अपघात ; १ महिला ठार , तीन जण जखमी

जिल्ह्यातील म्हसळा येथील घोणसे घाटामध्ये सिमेंट ब्लॉक वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याकडील संरक्षित कठड्यावर आदळून ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रक चालकाच्या केबिनमध्ये बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. ठार झालेल्या महिलेचे नाव देवका रामा भुणेश्वर (रा. म्हसळा ) असे आहे. अपघातामध्ये चालक सद्दाम हुसैन याच्यासह ३ पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास म्हसळा पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या