धाराशिव – तुळजापूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या सायकल चिन्हावर देवानंद रोचकरी निवडणूक लढवत आहेत. सायकल चिन्हावर त्यांचा यापूर्वी केवळ चार हजार मतांनी निसटता पराभव झालेला आहे. प्रचारपत्रकावर सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वापरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष समाजवादी पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून रोचकरी प्रचार यंत्रणा राबवित आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे केली आहे. त्यामुळे तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण? हा संभ्रम कायम आहे.

धाराशिव जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक २३ उमेदवार तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बिहार राज्यातील खासदार असलेले चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद पार्टीनेही या ठिकाणी उमेदवार दिला आहे. प्रमुख लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशीच आहे. महायुतीकडून भाजपाच्या कमळ चिन्हावर दुसर्‍यांदा तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणाजगजितसिंह पाटील निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर त्यांच्यासमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मागील निवडणुकीतील पराभूत उमेदवार तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याऐवजी धीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले धीरज पाटील यांच्या उमेदवारीसाठी शेजारच्या लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अमित देशमुख यांनी त्यांचे वजन वापरले. धीरज पाटील यांच्यासमोर तुळजापूर येथील स्थानिक उमेदवार असलेले देवानंद रोचकरी यांनी नवा पेच निर्माण केला आहे. रोचकरी समाजवादी पार्टीच्या सायकल या चिन्हावरून यंदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी २००४ साली त्यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या सायकल चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी मधुकरराव चव्हाण यांना ४० हजार ९५८ तर देवानंद रोचकरी यांना ३७ हजार ५१३ इतकी मते मिळाली होती. चार मतांनी रोचकरी यांचा त्यावेळी निसटता पराभव झाला होता.

Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Aditya Thackeray eknath shinde
Aditya Thackeray : “शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह आठ जणांना परत यायचं होतं, पण…”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं आठवडाभरापूर्वी ‘मातोश्री’वर काय घडलं

हेही वाचा – महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका

हेही वाचा – “काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

समाजवादी पार्टी हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. महाविकास आघाडीने काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर धीरज पाटील यांना मैदानात उतरविले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी निवडणुकीत शड्डू ठोकून उभे आहेत. महाविकास आघाडीतील ही मैत्रीपूर्ण लढत आहे की, आघाडीत बिघाडी झाल्यामुळे समाजवादी पार्टीने आघाडी धर्म नाकारून रोचकरी यांना उमेदवारी दिली, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आलेली नाही. त्यातच रोचकरी यांच्या प्रचार पत्रकावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष समाजवादी पार्टीचा अधिकृत उमेदवार असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच या प्रचारपत्रकावर सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अबु आझमी, सुप्रिया सुळे, शेकापचे जयंत पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचेही छायाचित्र दिसत आहेत. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बाळासाहेब ठाकरे यांचाही ठळक फोटो त्यावर आहे. या पत्रकावरून काँग्रेसचे धीरज पाटील यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. तर रोचकरी यांनी हे पत्रक कोण छापले? याबाबत आपल्याला माहिती नाही. निवडणूक विभागाने विचारणा केल्यास आपण हेच उत्तर देणार आहोत. तुळजापुरात आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. समाजवादी पार्टी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याचे रोचकरी यांनी सांगितले.

Story img Loader