१९ फेब्रुवारी रोजी अमरावतीत पार पडलेल्या एका शिवजयंतीच्या कार्यक्रमात विचित्र प्रकार घडला आहे. या कार्यक्रमात एक तरुण थेट भाजपा खासदार अनिल बोंडेंशी भिडला आहे. व्याख्यान सुरू असताना खासदार अनिल बोंडेंनी तरुणाच्या भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेतला आणि संबंधित तरुणाला “तू मूर्ख आहेस का?” असं विचारलं. यावर शिवव्याख्याता तरुण तुषार उमाळे यानेही खासदार अनिल बोंडे यांना त्यांच्याच भाषेत सुनावलं. “तुम्ही मूर्ख आहात का?” असा सवाल तुषार उमाळे याने विचारला.

शिवजंयतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. शिवव्याख्याता तुषार उमाळे भाषण करत असताना, तो शिवाजी महाराज मुस्लीमद्वेष्टे कसे नव्हते, याबाबत आपली भूमिका मांडत होता. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अनिल बोंडे यांनी भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेतला. “ये शहाण्या… तू मूर्ख आहेस का?” असं अनिल बोंडे यांनी विचारलं. यावर संबंधित तरुणाने खासदार अनिल बोंडे यांनी उलट उत्तर दिलं. “तुम्ही मूर्ख आहात का?” असा प्रतिप्रश्न विचारला.

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Sharad Pawar was given a clear speech by the Collector Office on the invitation of Namo Maha Rozgar Melava
… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती
Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…

या प्रकारानंतर अनिल बोंडे यांना संताप अनावर झाला. ते शिवव्याख्याते तुषार उमाळे या तरुणावर धावून गेले. पण उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करत, परिस्थिती नियंत्रणात आणली. अनिल बोंडे पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसल्यानंतर संबंधित तरुणाने भरमंचावरून अनिल बोंडे यांना सुनावलं. “मी तुम्हाला घाबरत नाही. राज्यघटनेनं आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कदापि सहन केली जाणार नाही. आम्ही तुमचा सन्मान करतो. तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही वडिलधारी आहात, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर बंधण आणणार,” अशा शब्दांत तुषार उमाळेनं खासदार अनिल बोंडे यांना सुनावलं.

तुषार उमाळे भाषणात नेमकं काय म्हणाले?

“शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने दाखवायचं, हेच आमच्या लोकांना कळलं नाही. शिवाजी महाराज म्हणजे मुस्लीमद्वेष्टे होते, असं दाखवण्यचा प्रयत्न केला जातो. महाराज नाष्टा करायचा आहे… दोन मुसलमान कापून या… ते गेले आणि खपाखप दोन मुसलमान मारले… नाष्टा केला… आता दुपारची जेवायची वेळ झाली… १२ वाजले… महाराज चार मुसलमान कापून या… ते गेले खपाखप चार मुसलमान कापून आले… मग जेवण केलं. संध्याकाळी पुन्हा जेवणाच्या आधी सहा मुसलमान कापले. झोपेतून उठलं की ते केवळ मुसलमानच मारायचे, महाराजांना दुसरा काही उद्योगच नव्हता, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच की, महाराज कुठल्याही जाती धर्माला बांधील नव्हते. महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचं स्वराज्य निर्माण केलं होतं. मराठे जेव्हा लढायला जायचे, तेव्हा मावळ्यांना तुम्ही कोणत्या जातीचे आहात? असं विचारलं जात नव्हतं,” असं तुषार उमाळे आपल्या भाषणात म्हणाला.