१९ फेब्रुवारी रोजी अमरावतीत पार पडलेल्या एका शिवजयंतीच्या कार्यक्रमात विचित्र प्रकार घडला आहे. या कार्यक्रमात एक तरुण थेट भाजपा खासदार अनिल बोंडेंशी भिडला आहे. व्याख्यान सुरू असताना खासदार अनिल बोंडेंनी तरुणाच्या भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेतला आणि संबंधित तरुणाला “तू मूर्ख आहेस का?” असं विचारलं. यावर शिवव्याख्याता तरुण तुषार उमाळे यानेही खासदार अनिल बोंडे यांना त्यांच्याच भाषेत सुनावलं. “तुम्ही मूर्ख आहात का?” असं तुषार उमाळे याने विचारलं.

शिवजंयतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुषार उमाळे याने प्रतिक्रिया दिली आहे. घटनेच्या दिवशी नेमकं काय झाल, याचा खुलासा उमाळे यांनी केली. आपल्याला मरण आलं तरी आपण अनिल बोंडेंची माफी मागणार नाही. याउलट त्यांनीच माझी माफी मागावी, अशी मागणी तुषार उमाळेंनी केली आहे.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

हेही वाचा- ‘मुख्यमंत्र्यांना एक फोन केला आणि सर्व मागण्या…’, पुण्यात शरद पवार आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला

एक व्हिडीओ जारी करत तुषार उमाळे म्हणाला, “सध्या मला अनिल बोंडे यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. तुम्ही बोंडे साहेबांची माफी मागा, तुम्ही त्यांचा अपमान केलाय, अशी मागणी ते करत आहेत. पण मी त्यांचा कसा अपमान केला? मी त्यांचा कुठलाही अपमान केला नाही. त्यांनी माझा अपमान केला. त्यामुळे डॉ. बोंडे यांनीच माझी माफी मागायला हवी, मी त्यांची माफी कदापि मागणार नाही. मरण आलं तरीही मी माफी मागणार नाही. कारण मला या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे.”

हेही वाचा- “महाराष्ट्रात काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं…”, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांची मिश्कील टिप्पणी!

वाद झाल्यानंतर आपली भूमिका मांडताना अनिल बोंडेंना उद्देशून तुषार उमाळे म्हणाला, “मी एक निमंत्रित वक्ता आहे. येथे मला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही माझी मुस्कटदाबी करू शकत नाही. माझ्या अभिव्यक्तीचं तुम्ही हनन करू शकत नाही. तुम्ही गुंडागर्दी करू नका. मी तुम्हाला घाबरत नाही. किंबहुना मी भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याला घाबरत नाही. तुमच्यात जर हिंमत असेल तर मी भाषणातून जे काही बोलत आहे, ते मुद्दे तुम्ही खोडून दाखवा. माझ्यानंतर तुमचं भाषण आहे, त्यांनी आपल्या भाषणातून माझे मुद्दे खोडून काढले नाहीत…”

नेमकं प्रकरण काय?

शिवव्याख्याता तुषार उमाळे भाषण करत असताना, तो शिवाजी महाराज मुस्लीमद्वेष्टे कसे नव्हते, याबाबत आपली भूमिका मांडत होता. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अनिल बोंडे यांनी भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेतला. “ये शहाण्या… तू मूर्ख आहेस का?” असं अनिल बोंडे यांनी विचारलं. यावर संबंधित तरुणाने खासदार अनिल बोंडे यांनी उलट उत्तर दिलं. “तुम्ही मूर्ख आहात का?” असा प्रतिप्रश्न विचारला.

हेही वाचा- “तुम्हीच मूर्ख आहात”, भरमंचावर शिवव्याख्याता खासदार अनिल बोंडेंशी भिडला, VIDEO व्हायरल

तुषार उमाळे भाषणात नेमकं काय म्हणाले?

“शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने दाखवायचं, हेच आमच्या लोकांना कळलं नाही. शिवाजी महाराज म्हणजे मुस्लीमद्वेष्टे होते, असं दाखवण्यचा प्रयत्न केला जातो. महाराज नाष्टा करायचा आहे… दोन मुसलमान कापून या… ते गेले आणि खपाखप दोन मुसलमान मारले… नाष्टा केला… आता दुपारची जेवायची वेळ झाली… १२ वाजले… महाराज चार मुसलमान कापून या… ते गेले खपाखप चार मुसलमान कापून आले… मग जेवण केलं. संध्याकाळी पुन्हा जेवणाच्या आधी सहा मुसलमान कापले. झोपेतून उठलं की ते केवळ मुसलमानच मारायचे, महाराजांना दुसरा काही उद्योगच नव्हता, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच की, महाराज कुठल्याही जाती धर्माला बांधील नव्हते. महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचं स्वराज्य निर्माण केलं होतं. मराठे जेव्हा लढायला जायचे, तेव्हा मावळ्यांना तुम्ही कोणत्या जातीचे आहात? असं विचारलं जात नव्हतं,” असं तुषार उमाळे आपल्या भाषणात म्हणाला.