सांगली : मिरजेतील सुदन जाधव या अभियंत्याने घरातील गणपतीसमोर बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे. थर्मोकाल आणि पुठ्ठ्यांच्या माध्यमातून बनविलेली आकर्षक, नक्षीदार व कोरीव १२ मंदिरे लक्ष वेधून घेत आहेत. बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना आणि त्याचा महिमा देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या देखाव्याने गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सुदन जाधव हा प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात आपल्या कल्पकतेतून नाविण्यपूर्ण देखावे साकार करत असतो. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक विषयावर त्याने अनेक देखावे साकारले आहेत. मागील दोन वर्षांत त्याने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील बारा बलुतेदार आणि शिवरायांचे अपरिचीत शिलेदार या विषयावर ऐतिहासिक देखावे साकारले होते.

गणरायांची विविध रूपे दर्शविणारे मेळघाटात संग्रहालय, सहा हजारावर…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Clay idols, potters, Solapur,
मातीच्या मूर्तींची होते घरोघरी प्रतिष्ठापना ! सोलापूरजवळील गावांमध्ये वंशपरंपरेने कुंभार समाजाची सेवा
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
lamp posts with Hindu religious symbols in Koppal, Karnataka
कर्नाटकच्या कोप्पलमध्ये हिंदू धार्मिक चिन्हे असलेला लॅम्प पोस्ट काढण्याचा आदेश का ठरतोय वादग्रस्त?
Chandrapur, Wekoli, electronic weighing machine, fraud, crores of rupees loss, electronic chip, Ramnagar police, Faiz Traders, Vekoli employees,
चंद्रपूर : वजन काट्यात चीप लावून गैरप्रकार, वेकोलीच्या चार जणांविरूध्द गुन्हा
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
Pimpri Municipal Corporation survey of structures in blue flood line in the wake of floods in Pavana Indrayani Mula rivers Pune news
पिंपरी: निळ्या पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण; पोलीस बंदोबस्तात होणार कारवाई

देशभरात विखुरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांची परिक्रमा करण्यासाठी अनेक दिवस लागतात. त्यामुळे एकाच दिवशी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले तर? हा विचार करुन यंदाच्या गणेशोत्सवात घरातील गणपतीसमोर बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा साकारण्याची कल्पना त्याला सुचली. बारा ज्योतिर्लिंगांमध्ये सोमनाथ (वेरावळ, गुजरात), मल्लिकार्जून (श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश), महाकालेश्वर (उजैन, मध्य प्रदेश), ओंकारेश्वर (माधांता, मध्यप्रदेश), वैजनाथ (झारखंड), रामेश्वर (रामेश्वरम् तमिळनाडू), नागेश्वर (द्वारका, गुजरात), घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र), केदारेश्वर (केदारनाथ, उत्तराखंड), त्र्यंबकेश्वर (नाशिक, महाराष्ट्र), भीमाशंकर (भीमाशंकर, पुणे) या मंदिरांचा समावेश आहे. सुदन याने सदरची सर्व मंदिरे व शिवलिंगांच्या प्रतिकृती हुबेहुब साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – महाराष्ट्र जनता दलाला देवेगौडा यांची भूमिका, भाजपाशी युती अमान्य

हेही वाचा – मी अजितदादा विरोधात कधीच भूमिका मांडणार नाही – सुप्रिया सुळे

सुदन याने सर्व मंदिर बनविण्यासाठी आपल्या दैनंदिन कामातून वेळात वेळ काढून सुमारे साडेतीन महिने सतत परिश्रम घेतले. या प्रतिकृती घरातील गणपतीसमोर मांडून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाईही केली. तसेच मंदिरांसमोरच त्या-त्या मंदिरातील शिवलिंगांचीही मांडणी केली आहे.