वेरूळी (ता. वाई) येथे सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यामध्ये १४ जणांना ताब्यात घेतले असून, संशयित सर्व पुणे आणि वाई परिसरातील आहे. दरम्यान, कारवाईत ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हायप्रोफाईल अड्ड्यावर टाकलेल्या पोलिसांच्या धाडीने खळबळ उडाली आहे.

वेरुळी (ता. वाई) या डोंगराळ आणि दुर्गम भागातील मांढरदेवजवळ एका शेतात असलेल्या बंगल्यामध्ये आलिशान गाड्यांमधून आलेले संशयित लोक जुगार खेळत असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली. पोलिसांनी पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकला असता तेथे ३ पानी जुगार सुरू होता.

पोलिसांना पाहताच संशयितांनी पळापळ केली. मात्र, पोलिसांनी सर्वांची धरपकड केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता रोकड, आलिशान गाड्या, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा सुमारे ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राजेश जनार्दन श्रीगिरी (वय ५१, भोपळे चौक, पुणे, सध्या रा. वेरुळी), अमित श्रीकांत सुबंध (४०, फातिमानगर, पुणे), सुरेश बुबुतमल फुलभागर (५५, रा. ताबूत स्ट्रीट, पुणे), कांतिलाल ज्ञानेश्‍वर पवार (रा. डीएम रोड, पुणे), शंकर बळीराम परदेशी (५५, रा. कोंढवा, पुणे), ललित सोमलाल मेश्राम (३०, रा. चिंचवड, पुणे), रवींद्र नामदेव शिंदे (४५, रा. एकसळ, ता. कोरेगाव), गुलाब उत्तम भंडलकर (३७, रा. गुणवरे, ता. फलटण), अभिजित भीमराव सोनवणे (४२, रा. घोरपडी, पुणे), सुभाष विठ्ठल मिरगल (५४, रा. बाबाजान चौक, कॅम्प, पुणे), अनिल शंकर चिकोटी (५३, रा. न्यू मोदीखाना, पुणे), सिराज उस्मान धामनकर (वय ४१) सिराज उस्मान धामनकर (वय ४१, रा. बाबाजान दर्गा, पुणे), मनोज अशोक आडके (वय ३२, रा. ठाकुरकी, फलटण) व गणेश सुरेश शिवशरण (दांडेकर पूल, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.