दोघींचा जन्म एकत्रित. बालपण, शालेय आणि उच्च शिक्षणही एकत्रित. नोकरीही एकाच कंपनीत एकत्रितच करणाऱ्या दोघा जुळ्या बहिणींना एकमेकींशिवाय विभक्त राहता येणे शक्य नव्हते. त्यामुळे या दोन्ही जुळ्या बहिणींनी एकच वर निवडला आणि त्याच्याशी एकत्रितच लग्न उरकल्याची अजब घटना अकलूजसारख्या भागात घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक

एकाच तरूणाला वरमाला घालून विवाहबध्द झालेल्या दोन्ही जुळ्या बहिणी मूळ मुंबईत कांदिवलीत राहणाऱ्या आहेत. दोघीही आयटी इंजिनियर असून दोघीही मुंबईतच अंधेरीमध्ये एकाच आयटी कंपनीत नोकरी करतात. या दोघींनी मूळच्या अकलूजच्या अतुल नावाच्या तरूणाबरोबर एकत्रित विवाह केला आहे.

रिंकी आणि पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणी आपल्या वडिलांच्या पश्चात विधवा आईसह एकत्र राहायच्या. एकेदिवशी आईसह दोन्ही जुळ्या बहिणी आजारी पडल्या. त्यांना अतुल याने रूग्णालयात दाखल केले होते. टॕक्सी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या अतुल याने दोन्ही रिंकी आणि पिंकीसह त्यांच्या आईला आजारपणात केलेली मदत मोलाची होती. घरात पुरूष नसल्यामुळे अतुल आधार बनला होता. दरम्यान, दोन्ही जुळूया बहिणींपैकी एकीचा अतुलवर जीव जडला. ही बाब दुसऱ्या बहिणीच्या लक्षात आली. दोघीही एकमेकांच्या शिवाय जगूच शकत नव्हत्या. एकीने अतुलशी विवाह केल्यास दुसरीचे जगणे मुश्किलीचे ठरणार होते. म्हणून दोघींही अतुल याच्याशी एकत्रित विवाह करण्याचा निर्णय घेतला. आईनेही दोन्ही जुळ्या मुलींच्या भावना आणि अतुलची सेवाभावी वृत्तीही विचारात घेऊन त्याच्या एकट्याशीच दोन्ही जुळ्या मुलींना विवाह करण्यास संमती दिली.

हेही वाचा- “शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत रायगडावरून उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”

दुसरीकडे अतुलच्या घरची मंडळीही दोन्ही जुळ्या बहिणींशी त्याचा विवाह करण्यास मान्यता दिली. अतुलचे बहुतांशी नातेवाईक अकलूज परिसरात राहतात. त्यामुळे त्याचा हा अनोखा विवाह सोहळा अकलूजमध्या गलांडे हाॕटेलात करण्याचा घाट घातला. ठरल्यानुसार झालेल्या या विवाह सोहळ्यात अतुलच्या रूपाने एकाच वराला रिंकी आणि पिंकी या दोन्ही जुळ्या बहिणींनी वरमाला घातली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twin sisters married with the one man in akluj story of unique wedding dpj
First published on: 03-12-2022 at 23:32 IST