सरकारी कार्यालयातून ‘एजंट’गिरी करणाऱ्या दोघांना अटक

राहुरीतील तिघांनी श्रीरामपूरच्या प्रांताधिकाऱ्यांकडून जातीचे दाखले मिळवले होते.

arrest
प्रतिनिधिक छायाचित्र

नगर : विविध सरकारी कार्यालयातून ‘एजंट’गिरी करणाऱ्या दोघांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी राहुरीमध्ये ४० हजार रुपये स्वीकारताना पकडले. या दोघांनी नगरच्या जात पडताळणी कार्यालयातून दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्याचे आमिष दाखवले होते.

हबीब बाबूभाई सय्यद (५२) व शकील अब्बास पठाण (४३ दोघेही खासगी एजंट, रा. महादेववाडी, सडे, राहुरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना आज न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.

राहुरीतील तिघांनी श्रीरामपूरच्या प्रांताधिकाऱ्यांकडून जातीचे दाखले मिळवले होते. हे जातीचे दाखले खोटे असल्याने त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देऊ नये, असा दावा संगमनेरमधील एकाने नगरच्या कार्यालयाकडे केला होता. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी हबीब सय्यद याने तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी गेल्या बुधवारी (दि. १३) केली होती.

दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे हबीबने सांगत लाचेची मागणी केली होती. नंतर तडजोडीअखेर ही रक्कम ४० हजार रुपये ठरली. या मागणीची पडताळणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली.

त्यानंतर आज सकाळी राहुरीतील नितीन हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून हबीब सय्यद याने ४० हजार स्वीकारून ते शकील पठाण याच्याकडे दिले. त्याचवेळी दोघांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार या दोघा एजंटांचा राहुरीतील नोंदणी कार्यालय, श्रीरामपुरमधील प्रांत कार्यालयात वावर असतो. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two arrested for kidnapping agents government offices akp

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या