सोलापूर : विलक्षण अटीतटीच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रमुख उमेदवारांना त्यांच्या नामसदृश अन्य उमेदवारांचा फटका बसण्याची शक्यता असते. असे नामसदृश उमेदवार तुल्यबळ उमेदवारांना अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक उभे केले जातात. त्यामागे बोलवते धनी वेगळेच असतात. सोलापूर जिल्ह्यात माढा आणि करमाळा या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये तुल्यबळ उमेदवारांना नामसदृश उमेदवारांमुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माढा मतदारसंघांमध्ये ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांनी राजकीय वाऱ्याची दिशा पाहून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची साथ सोडत आणि स्वतः रिंगणात न उतरता पुत्र रणजित शिंदे यांना अपक्ष रिंगणात उतरविले आहे. त्यांची सत्त्वपरीक्षा होणार आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित धनंजय पाटील यांचे तगडे आव्हान आहे. परंतु या लढतीमध्ये अभिजित पाटील यांच्यासह अन्य तीन अभिजित पाटील अपक्ष उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित धनंजय पाटील यांच्यासह अभिजित धनवंत पाटील हे बसपचे उमेदवार आहेत. दोघांच्याही नावामध्ये बरेच साधर्म्य दिसून येते. शिवाय अभिजित तुळशीराम पाटील आणि अभिजित अण्णासाहेब पाटील असे अन्य दोन अपक्ष उमेदवार आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 _ BJP
Assembly Election: भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला; ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
NCP Sharad Pawar trumpet symbol in Solapur district 6 Constituency assembly elections 2024
सोलापुरात शरद पवार गटाला ‘ट्रम्पेट’ चिन्हाचा घोर; सर्व सहा मतदारसंघांत ‘ट्रम्पेट’ चिन्ह सक्रिय
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >>>Eknath Shinde : ‘लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांची पोलीस भरती’, मुख्यमंत्र्यांचे १० मोठे आश्वासनं

दुसरीकडे वजनदार अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांचे नामसाधर्म्य असलेले रणजित भैया शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. रणजित बबनराव शिंदे यांना प्रेमाने रणजित भैया या नावाने संबोधले जाते. अभिजित पाटील आणि रणजित शिंदे हे दोघेही तुल्यबळ प्रतिस्पर्धी असताना त्या दोघांच्या नामसदृश उमेदवारांचा फटका नेमका कोणाला बसणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता दिसून येते.

करमाळ्यातही नामसदृश उमेदवाराचा फटका तेथील अपक्ष आमदार संजय विठ्ठलराव शिंदे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेथे संजय लिंबराज शिंदे आणि संजय वामन शिंदे असे अन्य दोन उमेदवार आहेत. यापूर्वी २०१४ च्या करमाळा विधानसभा निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांच्याशी नामसाधर्म्य असलेले दोन उमेदवार उभे होते. त्याचा फटका आमदार शिंदे यांना बसला होता.

Story img Loader