scorecardresearch

बनावट आधार, पॅनकार्डव्दारे १८ कोटींचा वस्तू व सेवाकरचा घोटाळा उघड; गुजरातचे व्यापारी कोठडीत

व्यापाऱ्यांनी अस्तित्वात नसलेल्या धंद्याचे बोगस कागदपत्रांच्या आधारे नोंदणी घेतल्याचे आणि सदर व्यापारी बोगस बिले देत असल्याचे समोर आले आहे.

बनावट आधार, पॅनकार्डव्दारे १८ कोटींचा वस्तू व सेवाकरचा घोटाळा उघड; गुजरातचे व्यापारी कोठडीत
संग्रहित छायाचित्र

१२१ कोटींची बनावट बिले देऊन १८ कोटींचा वस्तू व सेवाकर इनपूट टॅक्स क्रेडिट हस्तांतरित केल्याचे उघड झाले. महाराष्ट्र वस्तु व सेवाकर विभागाच्या अन्वेषण शाखेने केलेल्या या कारवाईत फैजल व अजिज हसनानी यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा- “MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

मे. फरहत एन्टरप्रायजेस या व्यापार्‍याची तपासणी करत असताना अस्तित्वात नसलेल्या धंद्याचे बोगस कागदपत्रांच्या आधारे नोंदणी घेतल्याचे आणि सदर व्यापारी बोगस बिले देत असल्याचे आढळून आले. फरहत एन्टरप्रायजेसचा नोंदणी दाखला राजकोट येथील प्रोप्रायटर जावेद-अजिजभाई हसनानी यांनी घेतला असल्याचे दाखविण्यात आले. संबंधित नोंदणी १२१ कोटींची बनावट बिले देऊन १८ कोटींचा वस्तु व सेवा कर इनपुट टॅक्स क्रेडिट हस्तांतरित केल्याचे तपासणीदरम्यान दिसून आले. औरंगाबाद येथून तपास करत मुंबईच्या डोंगरी मस्जीद बंदरपर्यंत पोहोचला. या बाबतच्या १८ कोटींच्या घोटाळ्याची तपासणी करत असताना मुंबई व औरंगाबादेत छापा टाकून केलेल्या कारवाईत बनावट आधार कार्ड, सिमकार्ड, क्रेडिटकार्ड आदी वस्तु ताब्यात घेण्यात आल्या असून, ५०० कोटींची बिले दिल्याचे समोर येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 23:03 IST

संबंधित बातम्या