करोना विरूध्दच्या लढ्यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सव्वा दोन कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांना या निधीचा धनादेश बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी शुक्रवारी दिला.

करोना विषाणूचे संकट हे मानवजातीपुढे एक आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. करोना विरूध्द एक युध्दच पुकारण्यात आले असून या युध्दासाठी एक कर्तव्य म्हणून जिल्हा बँकेने योगदान देण्याचे ठरविले. याचाच एक भाग म्हणून जिल्हा बँकेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सव्वा दोन कोटींचा निधी देण्यात आला. या निधीचा धनादेश बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी जिल्हयाचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. या वेळी बँकेचे संचालक बाळासाहेब व्हनमोरे, बँकेचे कार्यकारी संचालक जयंतराव कडू, व्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते.