सांगली : गुहागर – विजापुर राष्ट्रीय मार्गावर खानापूरनजीक झालेल्या रस्ते अपघातामध्ये दोघे जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री साडेअकरा वाजणेच्या सुमारास घडली.

खानापूर जवळ दुचाकी व चारचाकी वाहन यांच्यात समोरासमोर धडक होउन हा अपघात घडला. या अपघातात बेणापूर येथील रुपेश शेखर गायकवाड (वय २८) व सुमित प्रविण धेंडे (वय १४) या दोघांचा मृत्यू झाला तर अश्वजित दाजी धेंडे हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. अपघातातील दुचाकीचा चक्काचुर झाला आहे.

आणखी वाचा-“भारत लवकरच विश्वगुरूपदी आरुढ होईल,” सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन; म्हणाले…

बेणापूर येथील रहिवासी असलेला रुपेश गायकवाड हा रात्री अकराच्या सुमारास दोन मित्रांसह खानापूर कडून बेणापूरकडे दुचाकी हिरो गाडीवरून वरून चालला होता. यावेळी भिवघाट कडून खानापूरकडे चाललेल्या चारचाकी स्विफ्ट डिझायर व रुपेश गायकवाड याच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अश्वजित धेंडे हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर भिवघाटच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार करून अधिक उपचारासाठी सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Story img Loader