Two dead bodies found Alibag Morbe Dam case registered against two unknown person khalapur police station | Loksatta

मोरबे धरणात दोन मृतदेह आढळले ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलसींनी केलेल्या प्राथमिक तपासात दोघांचाही खून झाल्याची बाब समोर आली आहे.

मोरबे धरणात दोन मृतदेह आढळले ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मोरबे धरणाच्या पाण्यात काल दुपारी दोन मृतदेह आढळून आले होते. यात एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश होता. सुरवातीला ही आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र दोघांचाही खून करून मृतदेह पाण्यात टाकल्याची बाब समोर आली आहे. यानंतर आता या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खालापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात वरोसेवाडी गावच्या हद्दीत दोन मृतदेह आढळून आले होते. सुरवातीला ही आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलसींनी केलेल्या प्राथमिक तपासात दोघांचाही खून झाल्याची बाब समोर आली आहे. दोघांची तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करून ही हत्या करण्यात आली आहे. यानतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचेही मृतदेह धरणात टाकून देण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर पोलीसांनी अज्ञात इसमाविरोधात भादवी कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : “आरएसएच्या कार्यालयातील शस्त्रांकडे एनआयए डोळेझाक करते”, एसडीपीआयचा आरोप

दरम्यान या घटनेनंतर अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, आणि खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश त्यांनी पोलीसांना दिले आहेत.पोलीस निरीक्षक कुंभार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मधुकर पिचडांच्या सत्तेला २८ वर्षानंतर राष्ट्रवादीने लावला सुरुंग; अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत सत्तांतर

संबंधित बातम्या

Video: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत! भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का?
“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!
Maharashtra Karnataka Dispute : ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडास आवर घालावा आणि…’ राज ठाकरेंचा सूचक इशारा!
Maharashtra Breaking News Live : सीमाप्रश्नावरून राज ठाकरेंनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलं; वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर!
“बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगावं की…”; सामाजिक वातावरण बिघडतंय म्हणणाऱ्या बावनकुळेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सकाळी चेहरा धुताना कोणते पाणी वापरावे थंड की गरम? जाणून घ्या Skin Care बाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी
FIFA WC 2022: “लाजिरवाणा प्रकार!” रोनाल्डोला वगळल्याने त्याची गर्लफ्रेंड पोर्तुगालच्या व्यवस्थापनावर भडकली
Govt Job: सरकारी नोकरीचाच हट्ट कशासाठी? जाणून घ्या सरकारी नोकरीचे फायदे; या नोकऱ्यांची क्रेझ कायम राहण्याची कारणं कोणती?
VIDEO: दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा जल्लोष, मनोज तिवारींच्या ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स
१३ डिसेंबरला पुणे बंद; राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ विविध संघटनांचा निर्णय