सावंतवाडी शहरात दोन वृद्ध महिलांची हत्या

दोघाही वृध्दाचा डोक्यावर तसेच हातावर मानेवर मोठे वार करण्यात आले होते.त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

murder
प्रातिनिधिक छायाचित्र

सावंतवाडी  : शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी शहरात आज सकाळी दोन ज्येष्ठ नागरिक वृद्ध  महिलांचे दुहेरी हत्याकांड झाल्याचे उघडकीस आले आणि सिंधुदुर्ग जिल्हा हादरून गेला. पोलिसांच्या मते अज्ञात कारण आणि अज्ञात हत्याराने घडलेल्या या प्रकाराने पोलीस दलाने सकाळपासून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान संबंधित हत्याऱ्याच्या पायांचे ठसे रक्ताच्या थारोळ्यात आढळले असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी म्हटले आहे. प्रॉपर्टीसाठी खुन घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मध्ये घर मालकिण आणि तीच्या देखरेखीसाठी (केअरटेकर) असलेली वृध्द महिला बळी गेला आहे. सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला असून दोन वृद्ध महिलांची राहत्या घरात शनिवारी रात्री च्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली आहे.हे हत्याकांड प्रॉपर्टी च्या वादातून घडले असावे असा पोलीसाचां प्राथमिक अदाज असून हत्या झालेल्या मध्ये प्रॉपर्टी ची मालकीण श्रीमती निलिमा नारायण खानविलकर (८०) व तिच्या देखरेखीत साठी (केअरटेकर) असलेल्या शालिनी शांताराम सावंत (७७)यांचा समावेश आहे.  या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली व अधिकाऱ्यंना तपासाबाबत मार्गदर्शन केले. सावंतवाडी शहरातील उभा बाजार येथील घोडगे निवास स्थानाच्या समोर खानविलकर कुटुंब असून या घरात नीलिमा खानविलकर या वृध्द महिला एकटय़ाच राहत होत्या.त्याचा भाचा हा मुंबई येथे असतो त्यामुळे त्याचे मित्र समाजसेवक राजू मसुरकर यांनी सावंतवाडीतील एक फूले विक्री करणारी महिला शालिनी सावंत यांना तीच्या सोबत देखरेखी साठी ठेवण्यात आले होते. या दोघाीना जेवणाचे डबेही बाहेरून दिले जात होते.दखरेखीसाठी असलेल्या महिलेला डबा तिचा मुलगा देत असे तर घरांची मालकीण निलिमा खानविलकर हिला डबा बाहेरून आणून दिला जात होता. शनिवारी सांयकाळी ठरल्या प्रमाणे हा डबा आणून देण्यात आला होता. देखरेखीसाठी असलेल्या महिलेला तिचा मुलांने सांयकाळी साडेसात सुमारास जेवणाचा डबा आणून दिला दोघींनी ही जेवण केले नव्हते. गॅस वर तसेच जेवण होते .दरम्यान रविवारी सकाळी नेहमी प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक राजू मसूरकर हे श्रीमती खानविलकर या वृध्द असल्याने त्याना हाक मारण्यासाठी गेले असता त्याना दोन्ही वृध्द महिला जेवण घेणाऱ्या खोलीत रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यामुळे मसूरकर हे चांगलेच हादरून गेले त्यांनी लागलीच पोलिसांना तसेच आजू बाजूच्या लोकांना याबद्दल माहिती दिली त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व वस्तूस्थीती जाणून घेतली दोन्ही वृध्द महिलांना क्रुरतेने मारले असून,तीक्ष्ण हत्याराचा वापर करण्यात आला आहे.दोघाही वृध्दाचा डोक्यावर तसेच हातावर मानेवर मोठे वार करण्यात आले होते.त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

या दोन्ही वृध्दाच्या गळ्यात सोन्याच्या चैन होत्या मात्र या चेन तशाच असल्याने चारीच्या उद्देशाने हे कृत्य केले नसून ज्या घरात हत्या झाली ते घर व आजू बाजूची जागा अशी मिळून १४ गुठे जागा आहे.त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी ही जागा असल्याने कोणाला तरी या जागेचा मोह ही आवरता आला नसवा त्यामुळे हे कृत्य केले की काय असा सशंय पोलीस प्राथमिक चौकशीत व्यक्त केला आहे.  सावंतवाडीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाचा प्रकार प्रथमच घडला आहे.त्यामुळे हा प्रकार ओळखीतूनच झाला की काय अशी चर्चा असून,पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील कुटीर रूग्णालयात हलविले आहेत.शालिनी सावंत हिचा मुलगा राजू हा घटनास्थळी आला होता तर निलिमा खानविलकर हिचा भाचा हा मुंबई हून मालवण कट्टा येथे आल्याचे पोलिसांनी सांगितले त्यामुळे त्याला या घटनेची माहीती देउन बोलवून घेण्यात आले असून,तो ही सावंतवाडीत दाखल झाला आहे . पोलीस पोलीस निरीक्षक शंकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांच्यासह पोलिस  पथकाने पाहणी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two elderly women brutally murdered in sawantwadi zws