शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे महावितरणचे सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले. महावितरणचे दीडशे खांब, तीन रोहित्रे कोसळली, तसेच ३४ गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. अंगावर वीज पडल्यामुळे जामदया येथे एक, तर बोरी शिकारी येथे अंगावर िभत पडल्यामुळे एक असा दोन घटनांमध्ये दोन शेतक ऱ्यांचा मृत्यू झाला. औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे अंगावर वीज पडल्याने तीन जण जखमी झाले.
जिल्ह्यात ठिकठिकाणी शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले, तर काही ठिकाणी उडालेले पत्रे वीज वाहिन्यांवर अडकून पडले. रस्त्यांवर झाडे पडली. सेनगाव तालुक्यातील जामदया येथील रामदास शालिक चिभडे (वय २१) हा शेतकरी अंगावर वीज पडल्याने जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला.
िहगोली तालुक्यातील बोरी शिकारी येथील शेतकरी साहेबराव बेंगाळ (वय ६०) यांचा अंगावर िभत पडल्याने मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील उत्तम नागरे यांच्या शेतावर वीज पडल्याने तीन शेळ्या दगावल्या, तर ज्ञानेश्वर नागरे, जगन नागरे व गणेश नागरे हे जखमी झाले.
वादळामुळे महावितरणला मोठा फटका बसला. सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले. गोरेगाव परिसरात विजेचे ८० खांब कोसळले. यात ३० मोठय़ा, तर ५० लहान खांबांचा समावेश आहे. या शिवारातील तीन रोहित्रे पडली. वडगाव परिसरात १८ गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. या परिसरात महावितरणचे ३० लाखांचे नुकसान झाले. िहगोली तालुक्यात विजेचे ७६ खांब पडले. यात ४० मोठे, तर ३६ लहान खांबांचा समावेश आहे. यामध्ये १० लाखांचे नुकसान झाले. िहगोली व वसमत तालुक्यांतील प्रत्येकी ७, तर कळमनुरीतील २ अशी १६ गावे अंधारात आहेत. वादळामुळे विजेचे खांब पडल्याने अनेक गावे अंधारात सापडली. गोरेगाव परिसरात महावितरणने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. कळमनुरी, वसमत तालुक्यांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक साहित्यपुरवठा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.                             रोहिणी नक्षत्राच्या दमदार सलामीला गारांचा बोनस
वार्ताहर, उस्मानाबाद
खरीप पेरणीसाठी मशागतीत मग्न व पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्राने तूर्त दिलासा दिला. जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे वातावरण तयार झाले असून, काही ठिकाणी दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. रविवारी परंडा शहर व तालुक्यात गारांसह जोरदार वृष्टी झाल्याने शेतकरी वर्ग सुखावून गेला. रविवारच्या आठवडी बाजारात भाजीविक्रेत्यांचे यामुळे हाल झाले. त्यांच्या पालेभाज्या, फळभाज्यांवर मोकाट जनावरांनीच ताव मारला.
परंडा शहरासह तालुक्यात रविवारी रोहिणीचा जोरदार पाऊस झाला. जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले. अध्र्या तासात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसात काचाळी गोटय़ांच्या आकारातील गारा पडल्या. लहान मुलांनी या गारा गोळा करून त्याची चव चाखली. मागील अनेक दिवसांपासून वातावरणात असलेली उष्णतेची लाट या पावसामुळे कमी झाली. अंगाची लाहीलाही होत असलेल्या नागरिकांना रोहिणीच्या पावसाने चांगली सलामी दिल्याने उष्णतेच्या झळांपासून सुटका मिळाली. या पावसात वाऱ्याचा जोर असल्याने, तसेच परंडय़ाचा आठवडी बाजार यामुळे भाजीपाला विक्रेत्यांची धांदल उडाली. अनेक व्यापारी आपला भाजीपाला तेथेच सोडून निघून गेले. या भाजीपाल्यावर मोकाट जनावरांनी ताव मारला.