दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन जखमी

शहरालगतच्या देवमोगरा कॉलनीत शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी दोघांना बेदम मारहाण करत सुमारे ६५ हजार रुपयांची रोकड व दागिने

शहरालगतच्या देवमोगरा कॉलनीत शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी दोघांना बेदम मारहाण करत सुमारे ६५ हजार रुपयांची रोकड व दागिने लंपास केले. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडेल रस्त्यावरील या कॉलनीत किरण गणेश पाडवी यांचे घर आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्या घराची कडी उघडून सात दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. आवाजाने जाग आलेल्या किरण पाडवी आणि विलास वसावे यांना त्यांनी लोखंडी सळईने मारहाण सुरू केली. त्यांच्याकडील दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांनी हिसकावून घेतली. वळवी यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे कर्णफुले व लोखंडी कपाटातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तर दुर्गा वसावे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व अन्य दागिने काढून घेतले. सर्व सदस्यांना घरात कोंडून दरोडेखोरांनी पोबारा केला. या घटनेची माहिती समजल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत गवळी, देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक डी. व्ही. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वलवाडी शिवारातील त्रिमूर्ती सोसायटीत मध्यरात्री चोरटय़ांनी हात साफ केला. राजेंद्र पाटील यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून एक लाख सहा हजार रुपयांची रोकड व दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. या वेळी चोरटय़ांनी पाटील कुटुंबीयांना बेशुद्ध करण्यासाठी औषधाचा वापर केल्याचा संशय आहे. घरात चोरी झाल्याची बाब पाटील कुटुंबीयांना शुद्धीवर आल्यावर लक्षात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two hearted in robbery attack in dhule

ताज्या बातम्या