अलिबाग – अलिबाग समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी बैलगाडी स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विनायक जोशी आणि राजाराम गुरव, अशी मृतांची नावे आहेत. गेल्या सहा महिन्यांत बैलगाडी शर्यतीदरम्यान झालेली ही चौथी दुर्घटना आहे. त्यामुळे बैलगाडी स्पर्धेतील प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून मंगळवारी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान बैल उधळून बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली. विनायक जोशी (वय ७०) रा. ब्राम्हण आळी, अलिबाग आणि राजाराम गुरव (वय ७५) रा. झिराड, अलिबाग हे दोघे गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत दोघांनाही अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. यापैकी विनायक जोशी यांचा मुंबईत नेत असतांनाच रात्री मृत्यू झाला, तर राजाराम गुरव यांचे बुधवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले.

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

हेही वाचा – महिला योजनांसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी, आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी

हेही वाचा – पुणे: मेहनत घेत असतानाच मल्लाचे निधन

या दुर्घटनेप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गेल्या सहा महिन्यांत बैलगाडी स्पर्धेदरम्यान झालेली ही चौथी दुर्घटना आहे. त्यामुळे बैलगाडी स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे.