कंटेनर-मोटारीची धडक; दोन ठार, एक जखमी

शिरवळ लोणंद मार्गावर लोणी गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनर आणि मोटार गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला.

शिरवळ लोणंद मार्गावर लोणी गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनर आणि मोटार गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. कंटेनर (एपी २९ टीए ८५२१) शिरवळहून लोणंदकडे जात होता. तर मोटारगाडी (एम एच १० बीएम ६३९१)लोणंदहून शिरवळकडे येत होती. हा अपघात लोणी गावच्या हद्दीत लोणी पुलाजवळ (ता. खंडाळा) घडला. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने दोन्ही गाडय़ा समोरासमोर एकमेकावर आदळल्या. त्यात मोटारगाडीतील प्रशांत प्रमोद जंगम (वय २२, रा. ठाण बारामती सावळ पुणे), बालाजी रामेश्वर बारापल्ले (२६, रा. लातूर रोड, लातूर) हे जागीच ठार झाले व अमोल अर्जुन खैरमाटे (वय २९, रा. वंजारवाडी, सांगली) हे जखमी झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two killed one injured in container car accident

ताज्या बातम्या