मोटार झाडावर आदळून दोन ठार, दोन जखमी

सुरुर-पाचगणी रस्त्यावर मध्यरात्री दीडच्या दरम्यान मोटारगाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन ठार आणि दोन गंभीर जखमी झाले.

सुरुर-पाचगणी रस्त्यावर मध्यरात्री दीडच्या दरम्यान मोटारगाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन ठार आणि दोन गंभीर जखमी झाले.
मुंबईहून पाचगणीला येत असताना रात्री दीडच्या दरम्यान मालाझ कारखान्याजवळ शेदूरजणे गावच्या हद्दीत मोटारगाडी क्र (एम एच ०२ बीटी ६७)चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने  गाडी विरुध्द दिशेला झाडावर आदळली. त्यात रशीम रईस शेख-दारुवाले (वय २२) व शबाना रईस शेख – दारुवाल २(४९) हे जागीच ठार झाले, तर रईस अब्दुल रहीमान शेख-दारुवाले (५५) व मुहमद हासन यादअली शेख (२२)हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाईला खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.अपघातातील सर्व जण वाईला राहणारे असून व्यवसाया निमित्त पाचगणीला राहतात. या अपघातात गाडीचे पूर्ण नुकसान झाले.अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two killed two injured in motor accident

Next Story
भाजपाचा सगळा प्रचार व्यक्तिकेंद्रित स्वरूपाचा-मुख्यमंत्री
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी