गडचिरोलीत चकमकीत २ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खोबरामेंडा गावाजवळच्या देवगड पहाडीत मंगळवारी पहाटे पाच वाजता पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खोबरामेंडा गावाजवळच्या देवगड पहाडीत मंगळवारी पहाटे पाच  वाजता पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले. सी ६० पथकाला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये २ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात या पथकाला यश आले. पोलिसांनी दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत, परंतु त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या दोघांकडून १ ‘एसएलआर’ आणि १ ‘थ्रीझिरोथ्री’ अशा दोन बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. या बंदुकांचा वापर गटातील मोठ्या नेत्यांकडून केला जातो. त्यामुळे हे दोघेही मोठे नक्षलवादी नेते असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two naxalite killed in gadchiroli

ताज्या बातम्या