चारचाकी गाडीशी टक्कर झाल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण ठार

ओणी अणुस्कुरा मार्गावरील येळवण-खडीकोळवणच्या खिंडीत दुचाकी आणि मॅक्झिमो या वाहनांची जोरदार धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू ओढवला. 

राजारूर : ओणी अणुस्कुरा मार्गावरील येळवण-खडीकोळवणच्या खिंडीत दुचाकी आणि मॅक्झिमो या वाहनांची जोरदार धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू ओढवला.  सिराज मुश्ताक नाईक (वय २२)  आणि महंमदसाहेब अलीसाहेब मापारी (वय ५०) (दोघेही राहणार सौंदळ) अशी मृतांची नावे आहेत.   

 तालुक्यातील सौंदळ मुस्लीमवाडी येथील लग्न समारंभात जेवणाच्या टेबलांवर अंथरले जाणारे कापड आणण्यासाठी हे दोघेजण दुचाकीवरून (गाडी क्र. एम एच 0८,एच ५६०४ ) पाचलला गेले होते. ते घेऊन परत येत असताना येळवण-खडीकोळवण येथील खिंडीत आले असता अचानक समोरून आलेल्या मॅक्झिमो गाडीशी ( गाडी क्र. एमएच ०४,एक्स एल ६१५५) त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. त्यामध्ये जोरदार मार लागल्याने दोघेहीजण जागीच ठार झाले.   अपघाताची खबर कळताच येळवण, खडीकोळवण, सौंदळ, रायपाटण परिसरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीवरील दोघांनाही रायपाटण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पण वैद्यकीय उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले.   अपघातानंतर मॅक्झिमो गाडीचा चालक फरार झाला आहे. रायपाटण पोलीस दूरक्षेत्रासह राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जनार्दन परबकर यांनी सहकार्यासह घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच फरारी चालकाचा शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two people killed four wheeler collided two wheeler vehicles strong beat ysh

Next Story
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिक्षकाला आजन्म कारावास
फोटो गॅलरी