सांगली : सांगलीतील व्यावसायिक पारेख बंधूंच्या निवासस्थानी सक्तवसुली संचलानलयाच्या (ईडी) पथकाने चौकशी सुरू केली आहे. पारेख बंधूंचा विद्युत साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे.
सांगलीमध्ये आज सकाळी ईडीचे दोन पथके दाखल झाली असून, दोन पथकांच्या मदतीने शिवाजीनगरमधील पारेख बंधूच्या दोन बंगल्यांमध्ये ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. ईडीचे अधिकारी चौकशी करत असलेल्या बंगल्याबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात आहेत. पारेख हे सांगलीतील बडे व्यावसायिक असून चौकशीचा अधिकृत तपशील देण्यास मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांचा नकार दिला.
