औरंगाबाद शहरातील सआदतनगरमध्ये सहा व चार वयाची एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन भावंडे सोमवारी दुपारी मृतावस्थेत घरातच आढळून आली. दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आली. मृत बालकांवर विषप्रयोग केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा- पुण्यात खराडीमध्ये बांधकाम प्रकल्पात सुरुंगाचा स्फोट, मजुराचा मृत्यू, एक जखमी
पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार आदिबा फहाद बसरावी व अ्लीबा फहाद बसरावी, अशी मृतांची नावे आहेत. सातारा-देवळाई परिसरातील सदाअतनगरमध्ये राहणारी दोन्ही बालके रात्री जेवण करून झोपी गेली होती. मात्र, सकाळी बराचवेळ उठली नाहीत. दुपार होत आल्यानंतरही उठत नसल्याने संशय आल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी सातारा पोलिसांचे पथक रवाना झाले होते.