scorecardresearch

Premium

मिरवणुकीतील आवाजाने दोघांचा हृदयविकाराने मृत्यू ; ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल

दहा दिवसापुर्वीच त्याच्यावर अ‍ॅजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तर दुधारी येथील तरूण शिरतोडे हा कामावरून घरी आल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला.

youth dies of cardiac arrest due to high decibel sound during ganesh immersion processions
प्रतिनिधिक छायाचित्र :

सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीमधील ध्वनीवर्धकांच्या तीव्र क्षमतेने जिल्ह्यात सोमवारी रात्री दोन तरूणांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला. या घटनेनंतर दुधारीतील मिरवणुकप्रकरणी ११ जणांविरुध्द विनापरवाना ध्वनीवर्धकाचा वापर करुन सार्वजनिक शांतताभंग केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर ७६ मंडळावर ध्वनीमर्याद भंग प्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> उदयनराजे भोसले कॉलर उडवतात, डान्स करतात, ही भाजपाची शिस्त आहे का? केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारताच…

delivery boy was robbed pune
पुणे : कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले
two dead after bike rams into divider on lalbaug flyover
मुंबईः लालबाग उड्डाणपुलावर अपघातात दोघांचा मृत्यू
online Fraud with a person
अमरावती : इंदिरा-सेस ॲप डाऊनलोड केले आणि पाहता पाहता ८४ लाख गमावले…
Boyfriend knife attack on girlfriend
प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् प्रियकरानेही गळा कापून घेतला, अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सोमवारी गणेश उत्सवात सातव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या कवठेएकंद (ता. तासगाव) येथे शेखर पावसे (वय ३२) आणि दुधारी (ता.वाळवा) येथे प्रवीण शिरतोडे (वय ३५) या दोन तरूणांचा मृत्यू झाला. सोमवारी कवठेएकंद आणि दुधारी येथे विसर्जन मिरवणुकीचा सोहळा सुरू होता. मिरवणुकीत ध्वनीवर्धकांच्या तीव्र आवाजात तरूणाईचा जल्लोष सुरू होता. या मिरवणुकीमध्ये हे दोन तरूण सहभागी झाले होते. पावसे हा कवठेएकंद येथील चावडीपासून बसस्थानकापर्यत मिरवणुकीत सहभागी झाला होता. बस स्थानक चौकात आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे तो घरी परतला, मात्र, घरी येताच त्याला भोवळ आल्याने तातडीने तासगावमधील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> गणरायाला निरोप देण्यासाठी पाऊसही हजर! पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात काय परिस्थिती असणार? जाणून घ्या

दहा दिवसापुर्वीच त्याच्यावर अ‍ॅजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तर दुधारी येथील तरूण शिरतोडे हा कामावरून घरी आल्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. मित्रासोबत नृत्य करीत असतानाच त्याला चक्कर आली. त्याला तातडीने इस्लामपूर येथील रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्याचाही उपचार सुरू होण्यापुर्वी ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी १२५ मंडळाच्या मंडळाच्या मिरवणुकीतील ध्वनीलहरीच्या तीव्रतेची तपासणी करण्यात आली. यावेळी ७३ मंडळाच्या मिरवणुकीत ध्वनीची तीव्रता ६५ डेसिबलहून अधिक आढळल्याने कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे पोलीस विभागाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two youth dies of cardiac arrest due to high decibel sound during ganesh immersion processions in sangli zws

First published on: 28-09-2023 at 20:21 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×