रत्नागिरी : लोकसभा  निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणाचा फटका शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांना विधानसभा निवडणुकीत  बसल्याची चर्चा रंगू लागली आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मातोश्रीवर जावून साळवी यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे यांनी राजन साळवी यांनाच झापल्याने राजन साळवी यांचे भाजपात जाणे आता जवळपास निश्चीत झाले आहे.

हेही वाचा >>> Supriya Sule : “…आता हेडलाईन करु नका नाहीतर मला जोडे बसतील”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

Four lakh devotees in Pandharpur for Maghi Ekadashi
टाळ-मृदंग, विठ्ठलनामाने दुमदुमली पंढरी!
Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद…
Marijuana worth six lakh rupees seized in Parbhani
परभणीत सहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
Lavani is more popular in folk art says Tara Bhavalkar
लावणी लोककलेत अधिक लोकप्रिय – तारा भवाळकर
BJP celebrates in Sangli after victory in Delhi
दिल्लीतील विजयानंतर सांगलीत भाजपचा जल्लोष
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही”, दिल्लीच्या निकालावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान
Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
school bus and tempo collided on tamsa road ardhapur saturday afternoon at 12 30
अर्धापुरात स्कूल बस-टेम्पोचा अपघात; ४ विद्यार्थ्यांसह चालक गंभीर जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता ढवळुन निघण्यास सुरुवात झाली आहे. राजापुर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार राजन साळवी यांना  पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांना पाडण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत यांनीच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांना मदत केल्याचा आरोप माजी आमदार राजन साळवी यांनी केला आहे.  किरण सामंत, उदय सामंत यांच्या बरोबर माजी खासदार विनायक राऊत यांचे  जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी राजन साळवी यांना विधानसभेत पाडण्यासाठी मदत केल्याने राजन साळवी यांना पराभवाचा सामना करावा लागला असा आरोप साळवी यांनी केला आहे.  मात्र लोकसभेत विनायक राऊत यांना पाडण्यासाठी माजी आमदार राजन साळवी यांनीच विद्यमान खासदार नारायण राणे यांना मदत केल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी राजन साळवी यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाडण्यात आल्याचे आता समोर आले आहे.

हेही वाचा >>> Santosh Deshmukh : “संतोष देशमुखांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी पकडले जात नसतील तर..”, वैभवी देशमुखची आर्त हाक

रत्नागिरी जिल्ह्यातील या पाडापाडीच्या राजकारणाचा मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला  सहन करावा लागला आहे. मात्र या सर्व नाराजी आणि पाडापाडीच्या राजकारणामुळे रत्नागिरीतील राजकारण चांगलेच ढवळुन निघाले असून आता माजी आमदार राजन साळवी कोणता निर्णय घेतात? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहीले आहे. नाराजी नाट्यानंतर मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेल्या राजन साळवी यांच्यावरच ठाकरे यांनी आगपाखड करुन पानउतारा केल्याने आता माजी आमदार राजन साळवी  शिवसेना सोडणार हे आता निश्चीत मानले जात आहे. मात्र ते शिवसेनेतून बाहेर पडून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader