स्वतः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पोलीस ठाण्यात

संगमनेर : शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी भाजपाचे शहर प्रमुख ॲड. श्रीराम गणपुले यांच्या श्रीमुखात लावण्याचा प्रकार आज संगमनेर शहरात घडला. घटनेची माहिती मिळताच शहरातच असलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहर पोलीस ठाण्यात जात दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महसूल मंत्री विखे संगमनेर मध्ये आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनात अर्ज दाखल करताना उमेदवार खताळ, गणपुले हे देखील त्यांच्या समवेत होते. अर्ज दाखल झाल्यानंतर मंत्री विखे पुढील कामासाठी रवाना झाले. त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांचीही पांगापांग झाली. गणपुले तिथे जवळच असलेल्या एका चहाच्या दुकानावर चहा घ्यायला गेले. त्यावेळी मागून अचानक येऊन काही कळायच्या आत कतारी यांनी गणपुले यांच्या कानशिलात लावल्याचे समजते. याप्रसंगी गणपुले यांच्या हातात असलेल्या चहाच्या कपातील चहा त्यांच्या कपड्यांवर सांडला. अचानक घडलेल्या या प्रसंगाने तेथे काही काळ गोंधळ व तणाव निर्माण झाला. मात्र यावर गणपुले यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठले. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. या घटनेची माहिती मंत्री विखे यांना मिळताच तेही माघारी फिरले आणि थेट पोलीस ठाणे गाठले. घटनेची माहिती घेतल्यानंतर दोषीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
maharashtra vidhan sabha election 2024 ex mla rahul jagtap file nomination
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा >>> Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”

दरम्यान आजचा प्रकार पूर्वीच्या वादातून घडलेली परिणीती असल्याची माहिती समोर मिळाली. या दोघांमध्ये पूर्वीपासूनच किरकोळ स्वरूपाचे वाद होते. पंधरवड्यापूर्वी समाज माध्यमात हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला होता. त्यातूनच आजची घटना घडल्याची माहिती मिळाली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून घेण्याचे काम चालू होते. गेल्या काही दिवसांपासून थोरात, विखे वादात संगमनेरातील वातावरण पेटलेले असताना त्यात आजच्या घटनेने अधिकच भर पडली.

हेही वाचा >>> “आता तर अशीही चर्चा होईल की मी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलो आणि…”, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हल्ले सहन करणार नाही – मंत्री विखे

उबाठा काय आणि खुबाटा काय हे सगळे सारखेच आहेत. हल्लेखोर महाविकासच्या पाकिटावर काम करणारे आहेत. ज्याने मारहाण केली त्याचे आयुष्यच पाकीट घेण्यात गेले. हॉटेल व्यवसाया आडून अवैध धंदे करतात. गरिबांच्या शिवभोजन थाळीत देखील त्यांनी पैसे खाल्ले. आमच्या कार्यकर्त्यांवरील हल्ला कदापि सहन करणार नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी बजावले.

भाजपात गेलो नाही, म्हणून माझ्यावर कारवाई – कतारी

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मी ही ऑफर स्वीकारली नाही. नंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख होण्याची ऑफर दिली परंतु आपण उद्धव ठाकरे यांचे प्रामाणिक सैनिक असल्याने या सगळ्या ऑफर आपण नाकारल्या. हा राग आणि सूडभावनेतून आपण उत्तम पद्धतीने चालवत असलेले शिवभोजन एक दिवसात बंद केले. वर्षभराचा करार असताना बस थांब्यावरील हॉटेलही एका दिवसात बंद केले. आपण सभेसाठी जात असताना भाजपाच्या शहरप्रमुखांनी आपल्याला वाटेत थांबवले आणि तू  भाजपा विरोधी पोस्ट का टाकली ? असे विचारले. यावेळी त्यांनी आपल्याशी अरेरावी केली, दमबाजी केली. याला पोलीसही साक्षीदार आहेत. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. ही सूडभावनेतून केलेली कारवाई असल्याचे ठाकरे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे.

Story img Loader