महाराष्ट्रात सध्या नव्या सरकारच्या स्थापनेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्यासह इतर किती आणि कोणते मंत्री शपथ घेणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांबाबत चर्चा असताना दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उदय सामंत यांच्या एका वक्तव्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यासंदर्भातली खरी पोस्ट वेगळी असून काही समाजकंटकांनी त्यावरच्या मजकुरात फेरफार करून ती व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?

उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या एका विधानाचा संदर्भ दिल्याचं कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन व संघटन वाढवेन असं एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. पण देवेंद्र फडणवीस म्हणाले की भविष्यात तुमचा पक्ष व चिन्ह जाणार आहे. मग काय डोंमल्याचं संघटन वाढवणार काय? मग त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार झाले”, असं उदय सामंत यांनी म्हटल्याचं या व्हायरल कार्डमध्ये म्हटलं आहे.

Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
Sanjay Raut News
Sanjay Raut : “मतदारांना XXX आणि लोकशाहीला…”, संजय राऊत यांची संजय गायकवाडांवर जोरदार टीका, एकनाथ शिंदेंना केलं ‘हे’ आवाहन
Arjun Khotkar On Kailas Gorantyal
Arjun Khotkar : “कैलास गोरंट्याल यांची दुकानदारी मी बंद करणार”, अर्जुन खोतकर यांचा थेट इशारा
Narhari Zirwal
Narhari Zirwal : “नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी लोकांचा आग्रह, पण मी…”, नरहरी झिरवाळांनी थेट जिल्ह्यांची यादीच सांगितली
Vaibhav Naik On Rajan Salvi
Vaibhav Naik : “मला आणि राजन साळवींना शिंदे गटाकडून…”, वैभव नाईक यांचा मोठा गौप्यस्फोट
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका

व्हायरल फेक पोस्ट…

खरी पोस्ट काय आहे?

दरम्यान, ‘लोकसत्ता’च्या नावे व्हायरल होणारा हा मजकूर ‘लोकसत्ता’नं दिलेला नसून कुणीतरी खोडसाळपणा केला असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकसत्तानं दिलेल्या मूळ कार्डमध्ये असणारा मजकूर वेगळाच असल्याचं समोर आलं आहे. “मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन आणि संघटना वाढवेन असं एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. मात्र आम्हा सगळ्या आमदारांची इच्छा आहे की त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनात जावं अशी आमची इच्छा आहे”, असा मूळ मजकूर त्या कार्डवर आहे.

‘लोकसत्ता’कडून शेअर करण्यात आलेली मूळ पोस्ट

या मजकुरासंदर्भात शेअर करण्यात आलेली मूळ पोस्ट बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४४ मिनिटांनी ‘लोकसत्ता’च्या अधिकृत एक्स हँडलवर उपलब्ध आहे.

उदय सामंत यांनी दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकारावर खुद्द उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या नावानं एक बातमी व्हायरल केली जात आहे. एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर अशी बातमी आली आहे. ते वाक्य माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे. जे घडलंच नाही, ते मी बोलल्याचं सांगणं चुकीचं आहे. हे वाक्य माझ्या तोंडी घालून कदाचित माझ्याबद्दलची एकनाथ शिंदेंच्या मनातली प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे. संबंधित वर्तमानपत्रानंही सांगितलं आहे की यात आमचा काहीही संबंध नाही. हे कार्ड कुणीतरी फेरफार करून तयार केलं आहे. यासंदर्भात मी स्वत: तक्रार दाखल करणार आहे. ही राजकारणातली फार वाईट गोष्ट आहे, अशं कुणीही करू नये. याबाबत कायदेशीर पर्यायांवर मी आमच्या लोकांशी चर्चा केली आहे”, असं उदय सामंत त्यांच्या स्पष्टीकरणात म्हणाले आहेत.

Story img Loader